मोबाईल हा आपली दैनंदिन कामं करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. अगदी किराणा सामान ऑर्डर करण्यापासून महिन्याची बीलं भरण्यापर्यंत आपण मोबाईलचा आधार घेतो. एका क्लिकवर सगळ्या गोष्टी आपल्यासमोर उघड करणाऱ्या या मित्राची काळजी घेणे पण तितकेच गरजेचे असते. प्रत्येक ठिकाणी सतत मोबाईल बघण्याचा काही जणांना जणू आजार झाला आहे असे वाटते. काहीजण तर बाथरूममध्येही फोन घेऊन जातात. पण अशावेळी फोन भिजण्याची शक्यता असते. अशावेळी किंवा कधी पावसात भिजल्यानंतर फोन बिघडण्यापासून कसा वाचवता येईल जाणून घ्या.

फोन भिजू नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, कारण फोन भिजल्यानंतर त्यामुळे आपली अनेक कामं अडुन राहू शकतात. यावरील एक उपाय म्हणजे काही वॉटरप्रूफ फोन लाँच झाले आहेत. पण त्यांची किंमत खूप जास्त असल्याने त्यांना फार कमी प्राधान्य दिले जाते.

आणखी वाचा : ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोन भिजल्यावर करा या गोष्टी

  • पाण्यात भिजल्यानंतर फोन ऑन आहे का तपासा, जर फोन ऑन असेल तर लगेच ऑफ करा.
  • त्यानंतर फोनमधून सिमकार्ड आणि एसडी कार्ड काढून टाका.
  • आता फोन एखाद्या कपड्याने पुसून घ्या.
  • त्यानंतर फोनचा कव्हर काढून, फोन तांदुळ असलेल्या डब्यात २४ तासांसाठी ठेवा.
  • २४ तासांनंतर फोन ऑन होतोय की नाही चेक करा.
  • जर फोन ऑन झाला तर आधी फोनचा स्पीकर चेक करा. जर स्पीकर चांगला असेल तर याचा अर्थ फोन बिघडला नाही.
  • जर या स्टेप्स वापरल्यानंतरही फोन चालू नाही झाला तर लगेच प्रोफेशनल व्यक्तीकडुन फोन तपासून घ्या.
  • फोनला पाण्यापासून वाचवण्यासाठी वॉटर रेजिसस्टंट कव्हर देखील वापरू शकता.