युट्यूब हे सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. आपला आवडता कंटेंट युजर्स युट्यूबवर कधीही पाहू शकतात. युट्यूबवर व्हिडीओ पाहताना नेहमी येणारी अडचण म्हणजे त्यावर सतत येणाऱ्या जाहिराती. व्हिडीओ पाहत असताना त्यातून लक्ष विचलित करणाऱ्या या जाहिरातींमुळे त्रस्त असाल तर एक सोप्पी ट्रिक वापरून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. कोणती आहे ही ट्रिक जाणून घ्या.

युट्यूबवर येणाऱ्या जाहिराती घालवण्यासाठी वापरा ही ट्रिक

  • लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर क्रोम ब्राऊजर उघडा आणि त्यात युट्यूब सुरू करा.
  • त्यामध्ये कोणताही व्हिडीओ प्ले करा.
  • त्यानंतर युआरएल (URL) वर क्लिक करून तिथे युट्यूब (youtube) लिहले आहे, तिथे t नंतर हायफन (-) जोडा, म्हणजे yout-ube याप्रकारे.
  • या ट्रिकमुळे तुम्हाला विना जाहिरात युट्यूब व्हिडीओ पाहता येईल.

आणखी वाचा : मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी टेलिग्रामची गरज नाही; व्हॉटसअ‍ॅपवरून करता येणार शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मार्टफोनसाठी वापरा ही ट्रिक

  • स्मार्टफोनमध्ये विना जाहिरात युट्यूब व्हिडीओ पाहण्यासाठी क्रोम ब्राउझर उघडा.
  • त्यामध्ये डेस्कटॉप मोड सुरू करा. नंतर त्यामध्ये युट्यूब सर्च करा.
  • त्यानंतर कोणताही व्हिडीओ सुरू करा.
  • युआरएलमध्ये लिहण्यात आलेल्या युट्यूबमधील ‘टी’ नंतर हायफन (-) जोडा.
  • अशाप्रकारे तुम्ही स्मार्टफोनमध्ये विना जाहिराती युट्यूब व्हिडीओ पाहू शकता.