Vodafone Idea (Vi) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड अॅड-ऑन पॅक लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. Vodafone च्या नवीन डेटा प्लानची किंमत १५१ रुपये आहे आणि यात तुम्हाला ८ GB डेटा मिळतोय. अलीकडेच टेलिकॉम कंपनीने ८२ रुपयांचे अॅड-ऑन लाँच केले आहे. ज्यामध्ये SonyLiv चा मोबाईल एक्सेस २८ दिवसांसाठी उपलब्ध आहे.

Vodafone Idea शी स्पर्धा करण्यासाठी, Airtel ने अलीकडेच दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. ज्यात तीन महिन्यांसाठी मोफत Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. एअरटेलच्या या प्लॅनची ​​किंमत ३९९ आणि ८३९ रुपये आहे, ज्यांची वैधता २८ दिवस आणि ८४ दिवस आहे.

व्होडाफोन आयडियाच्या वेबसाइटनुसार, १५१ रुपयांच्या प्रीपेड अॅड-ऑन पॅकमध्ये एकूण ८ जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन तीन दिवसांत उपलब्ध आहे. प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे. त्याची सर्व्हिस व्हॅलिडिटी नाही. टेलिकॉम टॉकने सर्वप्रथम हा प्लॅन जाहीर केला.

आणखी वाचा : Jio, Airtel, Vi: एकदा रिचार्ज करा वर्षभर फुकट बोला; जाणून घ्या काही भन्नाट प्लॅन्स

१५१ रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकशिवाय, Vi ने अलीकडेच ८२ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या पॅकमध्ये ४ GB डेटा उपलब्ध आहे, ज्याची वैधता १४ दिवस आहे आणि या प्लॅनमध्ये SonyLiv मोबाइल सबस्क्रिप्शन दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल सुरू झाल्यापासून रिलायन्स जिओ, एअरटेल आणि Vi सारख्या कंपन्या सतत असे प्रीपेड प्लॅन लॉन्च करत आहेत जे डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह येतात. या महिन्याच्या सुरुवातीला, Airtel ने ३९९ आणि ८३९ चे प्लॅन लॉन्च केले होते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शन उपलब्ध आहेत. जिओचे क्रिकेट प्लॅन आहेत, ज्यात हॉटस्टार सबस्क्रिप्शन, अमर्यादित कॉल आणि एसएमएस सारख्या सुविधा दिल्या जातात.