Vivo स्मार्टफोन कंपनी भारतात आपला नवीन T सीरीज स्मार्टफोन करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Vivo T-सीरीजचा हा फोन भारतात ९ फेब्रुवारीला लॉंच होणार आहे. Vivo T-सीरीज T1 5G अंतर्गत पदार्पण करणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये ५,००० mAh ची बॅटरी दिली जात आहे, जी सुमारे २० तास सतत चालल्यानंतरही लो होणार नाही. यासोबतच यामध्ये ४४ W फास्ट चार्जिंग सपोर्टही दिला जात आहे.
हे डिव्हाईस चीनमध्ये गेल्या वर्षी लॉंच करण्यात आले होते. भारतात त्याच्या पदार्पणाची अफवा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. Vivo ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर T1 5G इव्हेंट पेज लाईव्ह केलं आहे. Vivo T1 5G च्या भारतात अधिकृत लॉंच होण्यापूर्वी त्याच्या फिचर्सबद्दल आणि स्पेसिफिकेशन्स डिटेल्स जाणून घेऊया.
Vivo T1 5G
विवो कंपनीचा हा मिड-रेंज स्मार्टफोन असेल. ऑफरच्या फिचर्सनुसार भारतात फोनची किंमत २५,००० रुपये किंवा त्याहूनही कमी असू शकते. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो मागील बाजूस आयताकृती असेल. यामध्ये कूलिंग सिस्टीम आणि “टर्बो स्क्रीन” देखील असेल जी उच्च रिफ्रेश दरांना सपोर्ट देऊ शकते. यात १२० Hz रिफ्रेश रेट पॅनेल असेल. T1 5G ६४ MP मुख्य कॅमेरा सेन्सर, ८ MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ MP मॅक्रो कॅमेरासह येईल. फोनमध्ये १६ MP फ्रंट कॅमेरा देखील असेल.
आणखी वाचा : Adhaar Card : तुमचं आधार कार्ड बनावट तर नाही ना, अशा प्रकारे ओळखा….
स्पेसिफिकेशन
या फोनच्या स्क्रीनबद्दल बोलायचं झाल्यास, १०८०x २४०० पिक्सेलच्या फुल एचडी + रिझोल्यूशनसह ६.६७ इंचाचा डिस्प्ले असेल. यात एक एलसीडी पॅनेल असेल, काही फोन्सच्या विपरीत जे AMOLED पॅनेलसह येतात. हा फोन Snapdragon 778G SoC सह येईल. हा फोन १२ GB पर्यंत रॅम आणि २५६ GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. हे स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनच्या अंतर्गत आहे जे चीनमध्ये लॉंच केलं गेलं होतं, T1 च्या भारतीय मॉडेलसाठी समान स्पेसिफिकेशनची अपेक्षा केली जाऊ शकते.
आणखी वाचा : WhatsApp Tips: तुमचं अकाउंट हॅक होण्यापासून कसं रोखायचं? जाणून घ्या
आणखी काय अपेक्षा करावी ?
हे बॉक्सच्या बाहेर Android 11 सह येतो आणि यावर Funtouch OS 12 असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये ३.५ मिमी ऑडिओ जॅक आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.