Vivo सतत भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉंच करत आहे. कंपनीने काही आठवड्यांपूर्वी Vivo V25 Pro स्मार्टफोन लॉंच केला होता. Vivo V25 Pro हँडसेट रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतो. आता Vivo ने देशातील स्टॅंडर्ट Vivo V25 हँडसेटवरून पडदा उठवलाय. नवीन Vivo V25 मिड-बजटमध्ये मजबूत फीचर्ससह येतो. आम्ही या Vivo स्मार्टफोनबद्दल माहिती सांगणार आहोत. पहिल्यांदा फोन वापरल्यानंतर काय गोष्टी समजल्या ते जाणून घेऊया….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vivo V25 Unboxing
Vivo V25 Pro स्मार्टफोन ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आणि १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे २७,९९९ रुपये आणि ३१,९९९ रुपये आहे. Vivo V25 च्या बॉक्सबद्दल बोलायचे झाले तर तो अगदीच साधारण आहे आणि त्यावर फोनचा एक फोटो देखील नाही. बॉक्सवर Vivo चे ब्रँडिंग आणि फोनचे नाव लिहिलेले आहे. बॉक्सच्या मागील पॅनलवर ‘मेड इन इंडिया’ असा उल्लेख आहे, म्हणजेच हा फोन भारतातच बनवला आहे. हँडसेटचे सर्वात महत्त्वाचे फीचर्स म्हणजे त्यात दिलेला फ्लोराईट एजी ग्लास, ज्यामुळे त्याच्या मागील पॅनलचा रंग सूर्यप्रकाशात बदलतो.

बॉक्सच्या आत Vivo ने ४४ W चार्जर, USB Type-C केबल, क्विक स्टार्ट गाइड, वॉरंटी कार्ड, सिम इजेक्टर आणि एक पारदर्शक प्लास्टिक कव्हर दिले आहे. याशिवाय Vivo V25 फोनला संरक्षणासाठी प्लास्टिकमध्ये झाकून देण्यात आलंय. फोनच्या बॉडीबद्दल बोलायचे झाले तर तो प्लास्टिकचा बनलेला आहे. पण डिस्प्लेच्या संरक्षणासाठी गोरिला ग्लास ५ आहे. फोनचा मागील पॅनल मॅट फिनिशसह येतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते फिंगरप्रिंट्स सोडत नाही.

आणखी वाचा : ‘या’ तारखेपासून सुरू होतोय Flipkart Big Billion Days सेल; टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट

Vivo V25 Design
Vivo V25 स्मार्टफोनची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. पण फोन फारसा स्लिम नाही. डिस्प्लेच्या चारही बाजूंनी दिलेल्या कर्व्ह्ड चकचकीत आहेत. फोनसोबत ४४ W चार्जर उपलब्ध आहे. हँडसेटसोबत एक टाइप-सी केबल देखील येते.

स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. कॅमेरा मॉड्यूल मागील बाजूस किंचित वर केले आहे. Vivo चे ब्रँडिंग मागील बाजूस तळाशी दिलेले आहे.

Vivo V25 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसंच व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे फोनच्या उजव्या बाजूला आढळतात. सिम-इजेक्टर टूल, मायक्रोफोन, टाइप-सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल स्मार्टफोनच्या तळाशी आहेत. फोनच्या डाव्या बाजूला कोणताही पोर्ट किंवा ट्रे नाही आणि वरच्या बाजूला दुसरा मायक्रोफोन आहे. या Vivo स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक नाही.

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा Vivo V25 5G चालू कराल तेव्हा सेटअप प्रक्रिया दिसेल. तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन सेटअपसाठी विचारले जाईल. यानंतर, भाषा आणि इतर स्क्रीन लॉक, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक फीचर्सचा वापर करून फोन सहजपणे सेट केला जाऊ शकतो. हा फोन Android 12 आधारित Funtouch OS 12 सह येतो. तुम्हाला त्यात आधीच इन्स्टॉल केलेले अनेक अॅप्स मिळतील. यामध्ये Amazon, ByJU’s, Dailyhunt, Gamespace, Moj, Josh यांचा समावेश आहे. याशिवाय लिंक्डइन, फेसबुकसारखे सोशल मीडिया अॅप्सही फोनमध्ये इन्स्टॉल केले जातात. Google App Suite Vivo V25 मध्ये प्रीलोडेड देखील उपलब्ध आहे.

आणखी वाचा : 5G साठीची तगडी स्पर्धा! केवळ १५ हजारात iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री, जाणून घ्या फीचर्स

Vivo V25 Specifications
स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Vivo V25 मध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये १२ GB पर्यंत रॅम आणि १५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे जो HDR10+ पोर्टला सपोर्ट करतो. स्क्रीन फुलएचडी + रिझोल्यूशनसह येते आणि त्याचा रीफ्रेश रेट ९० हर्ट्झ आहे.

Vivo V25 5G ला पॉवर करण्यासाठी ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी ४४ W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये ६४ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा असेल जो OIS ला सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरे आहेत. फोनमधील ५० मेगापिक्सेल ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा मध्यभागी डिस्प्लेच्या वरच्या भागावर आहे.

कॅमेराद्वारे रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडीओ गुणवत्तेबद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन गोल्ड, ब्लू आणि डायमंड ब्लॅक कलरमध्ये लॉंच करण्यात आला आहे. हँडसेटच्या मागील बाजूस फ्लोराईट एजी ग्लास आहे. पण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर फक्त निळे आणि सोनेरी रंग बदलतात.

तुम्हाला सुंदर दिसणारा स्मार्टफोन हवा असेल तर Vivo V25 हा एक चांगला पर्याय आहे. या Vivo फोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रंग बदलणारा बॅक पॅनल.

More Stories onटेकTech
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo v25 5g unboxing first impressions check price features prp
First published on: 15-09-2022 at 20:27 IST