Vivo V25 सीरीज लवकरच भारतात लॉंच होणार आहे. VV V25 Pro बद्दल गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. Vivo च्या या नवीन सीरीजमध्ये Vivo V25 आणि Vivo V25 Pro लॉंच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने आता अधिकृत वेबसाइटवर आगामी फोनची मायक्रोसाइट बनवली आहे. Vivo V25 सीरीज या वर्षी लॉंच करण्यात आलेल्या Vivo V23 सीरीजचे अपग्रेड वर्जन असेल. विवोने ही सीरीज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्याची खात्री दिली आहे.

Vivo V25 Pro Specifications Listed
Vivo ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या सीरीजमधील पहिले डिव्हाईस Vivo V25 Pro चा फोटो शेअर केला आहे. Vivo V25 सीरीजसाठी तयार केलेल्या मायक्रो साइटवरून प्रो व्हेरिएंटचे मुख्य वैशिष्ट्य देखील समोर आलं आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर Vivo V25 Pro मध्ये मध्यभागी पंच-होल कटआउट असेल. हँडसेटला 3D कर्व्ड स्क्रीन आणि १२० Hz रिफ्रेश रेट मिळेल. डिव्हाईसला मागील बाजूस एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आणि रंग बदलणारा बॅक पॅनेल मिळेल. आगामी हँडसेटबद्दल खात्री झाली आहे की यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. फोनमध्ये ६४ MP प्रायमरी सेन्सर असेल जो OIS ला सपोर्ट करतो. याशिवाय फोनमध्ये हायब्रिड इमेज स्टॅबिलायझेशन, सुपर नाईट मोड, बोकेह फेअर पोर्ट्रेट मोड आदी सुविधा उपलब्ध असतील.

आणखी वाचा : डब्बा टीव्हीचा काळ गेला! OnePlus, Redmi, LG कडून स्मार्ट टीव्हीवर ६०%पर्यंत डिस्काउंट

VivoV25 Pro मध्ये MediaTek प्रोसेसर असल्याची खात्री झाली आहे. मीडियाटेक डायमेंशन १३०० प्रोसेसर हँडसेटमध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये ८ GB एक्सपांडेबल व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी उपलब्ध असेल. स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी ४८३० mAh बॅटरी उपलब्ध असेल जी ६६ W फास्ट चार्जिंगसह येईल.

लीक बद्दल बोलायचे झाले तर, नुकत्याच आलेल्या एका रिपोर्ट मध्ये असे समोर आले आहे की Vivo V25 Pro फोन भारतात १७ ऑगस्ट रोजी लॉंच होईल. हा हँडसेट भारतात ४० हजार रुपयांच्या रेंजमध्ये लॉंच होण्याची अपेक्षा आहे. हा Vivo फोन नुकताच Google Play Console वर दिसला. हा फोन Android 12 सह येईल असं समोर आलं आहे. आता Vivo India च्या अधिकृत वेबसाईटवर Vivo V25 Pro ची लिस्ट केल्यानंतर, लवकरच हा हँडसेट भारतात लॉंच केला जाईल अशी अपेक्षा आहे.