विवो एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. विवो कंपनी लवकरच आपली X100 फ्लॅगशिप सिरीज लॉन्च करणार आहे. या सिरीजमध्ये विवो कंपनी विवो एक्स १००, विवो एक्स १०० प्रो आणि विवो एक्स १०० प्रो प्लस हे तीन मॉडेल्स लॉन्च करू शकते. विवो एक्स १०० प्रो प्लस पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. चीनी स्मार्टफोन निर्माती असलेल्या विवो कंपनी विवो एक्स १०० आणि विवो एक्स १०० प्रो मध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी ९३०० चिपसेटचा वापर करू शकते. हा चिपसेट स्नॅपड्रॅगन Gen 3 प्रमाणेच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. विवोच्या एक्स १०० सिरीजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नुकतेच ‘V2309A’ नंबर असलेले मॉडेल एक विवो डिव्हाइस चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर २.२ दशलक्ष पेक्षा जास्त Antutu स्कोअरसह पहिला गेला आहे. मात्र बेस एक्स १०० किंवा एक्स १०० प्रो हे व्हेरिएंटमध्ये १ टीबी UFS 4.0 स्टोरेजसह येईल की नाही याबाबत कंपनीने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. हा फोन आऊट ऑफ बॉक्स अँड्रॉइड १४ वर चालू शकतो. याबाबतचे वृत्त The Indian Express ने दिले आहे.
आगामी काळामध्ये लॉन्च होणाऱ्या विवो फ्लॅगशिप फोनमध्ये १६ जीबी LPDDR5T रॅम असण्याची शक्यता आहे. हि रॅम सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या DRAM चे ववेगवान व्हर्जन असणार आहे. एक्स १०० सिरीजमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सना १२० W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. विवो एक्स १०० कदाचित २०२४ या वर्षांमध्ये लॉन्च होऊ शकतो. त्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटचा सपोर्ट मिळू शकतो.
विवो एक्स १०० मध्ये दिल्या जाणाऱ्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी यामध्ये V3 इमेजिंग चिपसह सोनीच्या LYT800 सेन्सरचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये ५३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये पेरिस्कोप लेन्समध्ये एक नवीन Zeiss Vario-APO-Sonnar लेन्स दिली जाऊ शकते. विवो एक्स १०० प्रो प्लसमध्ये प्रायमरी सेन्सर म्हणून ५० मेगापिक्सलचा सोनीचा IMX989, ५ मेगापिक्सलचा IMX598 अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा IMX758 पोर्ट्रेट लेन्स दिली जाऊ शकते. यामध्ये 10x झूमसह २०० मेगापिक्सलचा सॅमसंग HP3 टेलीफोटो पेरिस्कोप लेन्स देखील दिली जाऊ शकते. तसेच वापरकर्त्यांना या फोनमध्ये ६.७८ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे.