10 हजारांच्या आत तुम्हाला स्मार्टफोन हवा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Vivo Y02 भारतात लाँच झाला आहे. गेल्या वर्षी हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला होता. फोन ब्लॅक आणि ग्रे या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असल्याचे म्हटल्या जाते. या फोनची किंमत काय? आणि त्यात कोणते फीचर्स मिळतात? याबाबत जाणून घेऊया.

किंमत

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळत असून तो ८ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन व्हीवो इंडिया ई स्टोअरवरून खरेदी करू शकता. काही दिवसांमध्ये हा फोन इतर प्लाटफॉर्म्सवर देखील खरेदीसाठी उपलब्ध होईल.

(२ काय, ३ वेळा चार्ज होऊ शकतो फोन, ‘या’ ‘POWER BANKS’ची किंमत २ हजारांच्याही खाली, पाहा यादी)

फोन ऑर्चिड ब्ल्यू आणि कॉस्मिक ग्रे या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोनला १५ दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी लागू आहे. बजाज कार्ड युजर्ससाठी नो कॉस्ट ईएमआय बायिंग पर्याय उपलब्ध आहे.

फीचर्स

Vivo Y02 स्मार्टफोनमध्ये ६.५१ इंच एचडी + एलसीडी फूल व्ह्यू डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आली असून ती १ टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या सहायाने वाढवते येते. हा फोन अँड्रॉइडवर १२ वर आधारित कंपनीच्या स्वत:च्या फनटच ओएस १२ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. दीर्घकाळ काम करण्यासाठी फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन १८ तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाईम देतो, असा दावा केला जातो.

(अबब.. काही मिनिटांतच होणार फूल चार्ज! ‘या’ फोनमध्ये मिळू शकते २५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट)

Vivo Y02 स्मार्टफोनसह १० वॉट चार्जिंग अडाप्टर मिळतो. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात आले आहे. फोनला मागे ८ एमपीचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी पुढे ५ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.