अनलिमिटेड कॉलिंगसह, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा; जाणून घ्या Vi च्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची किंमत | Vodafone idea 3099 rupees popular recharge plan with unlimited calling and 2gb data for one year know complete offer | Loksatta

अनलिमिटेड कॉलिंगसह, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा; जाणून घ्या Vi च्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची किंमत

Vi च्या वर्षभरासाठी उपलब्ध होणाऱ्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनवर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत जाणून घ्या

अनलिमिटेड कॉलिंगसह, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा; जाणून घ्या Vi च्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची किंमत
वोडाफोनच्या रिचार्ज प्लॅनवरील आकर्षक ऑफर्स जाणून घ्या (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

Vodafone Idea Recharge Plan : वोडाफोन आयडिया (Vi) कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले जातात. इतर कंपन्यांसह स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उपलब्ध रिचार्ज प्लॅन्सवर अधिक ऑफर्स देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच वोडाफोनचा एक रिचार्ज प्लॅन लोकप्रिय आहे, जो वर्षभरासाठी उपलब्ध होतो. या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि यावर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत जाणून घ्या.

वोडाफोनचा वर्षभरासाठी उपलब्ध होणारा रिचार्ज प्लॅन
आणखी वाचा: WhatsApp स्टेटसमध्ये शेअर करता येणार Voice Note; जाणून घ्या नवे फीचर

  • वोडाफोनच्या वर्षभरासाठी उपलब्ध होणाऱ्या रिचार्ज प्लॅन्सपैकी एक रिचार्ज प्लॅन लोकप्रिय आहे, ज्याची किंमत ३०९९ रुपये आहे.
  • ३६५ दिवसांसाठी म्हणजेच एका वर्षासाठी हा रिचार्ज प्लॅन उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनवर रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो, इतकेच नाही तर दररोज रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान अनलिमिटेड इंटरनेट वापरण्याची सुविधा या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.
  • या रिचार्ज प्लॅनवर एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध होते.
  • ‘विकेंड डेटा रोलओव्हर’ची सुविधा देखील या प्लॅनवर उपलब्ध आहे.
  • या प्लॅनसह डिज्नी प्लस हॉटस्टारचे एका वर्षाचे मोबाईल सबस्क्रीप्शन उपलब्ध होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 13:21 IST
Next Story
४८,४९९ रुपयांत मिळवू शकता APPLE IPHONE 13, केवळ ‘हे’ करा