भारतात 5G सेवा उपलब्ध झाली आहे. परंतु अजुनही सगळ्या शहरांमध्ये 5G उपलब्ध झालेले नाही. जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनीच भारतात 5G सुविधा ५० हून अधिक शहरांमध्ये लाँच केले आहे. बीएसएनएल आणि व्होडाफोन आयडिया युजर्सना 5G लाँच होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. व्होडाफोन आयडिया युजर्सना कोणत्याही 5G स्कॅममध्ये न अडकता सिम कार्ड 5G मध्ये अपग्रेड करण्यासाठी वाट पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे व्होडाफोन आयडिया युजर्सना 5G संदर्भात एक स्कॅम मेसेज पाठवला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायबर क्रिमिनल्सकडुन 5G सेवेच्या मेसेजद्वारे व्होडाफोन आयडिया युजर्सची फसवणूक केली जात आहे. व्होडाफोन आयडियाकडुन अजुनही 5G सेवा लाँच झालेली नाही. टाइम्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया युजर्सना फोनवर आणि व्हॉटसअ‍ॅपवर 5G स्कॅम मेसेज पाठवला जात आहे.

आणखी वाचा: ‘या’ भन्नाट अ‍ॅप्ससह करा नव्या वर्षाची सुरुवात; तणाव कमी करण्यापासून अनेक गोष्टींसाठी ठरतील फायदेशीर

स्कॅमर्सकडुन पाठवण्यात येणाऱ्या मेसेजमध्ये युजर्सना 5G ॲक्टिव्हेट करण्यासाठी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात येते. ‘Vi 5G network is live. Click on the link below or call on XXXXXX number to upgrade’, असा मेसेज पाठवण्यात येत आहे.

मेसेजमधील लिंक पेटीएम अकाउंटशी जोडलेली आहे अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. यावर क्लिक केल्यानंतर युजर्सचे बँक खात्याची माहिती, वैयक्तिक डेटा ही माहिती स्कॅमर्सना मिळु शकते. यावरून फोन हॅक होऊन युजर्स पैसे देखील गमावू शकतात. त्यामुळे अशा मेसेजेस पासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शहरांमध्ये जिओ आणि एअरटेलकडुन 5G सेवा उपलब्ध झालेली नाही, त्या शहरातील जिओ, एअरटेल युजर्सना देखील असे स्कॅम मेसेज येत आहेत. या स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन टेलिकॉम कंपनीकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone idea users getting 5g live in your area message is a scam know more pns
First published on: 29-12-2022 at 13:13 IST