Volocopter Drone taxi takes first flight : एका महिन्यापूर्वी एक्सपेंग टू या उडणाऱ्या कारने दुबईतून उड्डाण घेत भविष्यात उडणाऱ्या वाहनांमध्ये प्रवास करण्याच्या स्वप्नांना मूर्त रूप दिले होते. त्यानंतर या क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने तंत्रज्ञान निर्मिती होत असल्याचे नुकत्याच एका चाचणीतून दिसून आले आहे. एका इलेक्ट्रिक हेलिकॉप्टरने गुरुवारी पॅरिस नजीक कन्व्हेन्शनल एअर ट्रॅफिकमधून उड्डाण केले आहे. २०२४ पासून व्यावसायिक उड्डाण घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर तयारी करत आहे.

व्होलोकॉप्टर असे या हेलिकॉप्टरचे नाव असून ते ८ रोटर्स असलेल्या ड्रोनसारखे दिसून येते. व्होलोकॉप्टरने एका प्रवाशासह पॅरिसबाहेरील पॉनटॉइस कॉर्माइलेस एअरफिल्डवरून उड्डाण केले. पुढील १८ महिन्यांत आम्ही प्रमाणन करण्यासाठी हेलिकॉप्टरला तयार करू. २०२४ मध्ये या हेलिकॉप्टरने व्यावसायिक उड्डाणे घेता येईल, अशी आशा व्होलोकॉप्टरचे सीईओ डर्ग होके यांनी व्यक्त केली.

(ब्ल्यू टीक शुल्क, बनावट खाती, इत्यादींमुळे ट्विटर नकोसे वाटतंय? खाते डिलीट करायचे असल्यास ‘हे’ करा)

हेलिकॉप्टरने आपोआप प्रवाशाबरोबर उड्डाण घ्यावे, अशी कंपनीची इच्छा आहे. मात्र, पायाभूत सुविधा, हवाई क्षेत्र एकत्रीकरण आणि सार्वजनिक स्वीकृती या संदर्भात अजूनही बरेच काम करणे आवश्यक होते, असे कंपनीने मान्य केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेलिकॉप्टरचे फ्लाय बाय व्हायर सिस्टिम आणि अनेक रोटर्स त्यास पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा उड्डाण करणे खूप सोपे करते, असे चाचणी घेणारे वैमानिक पॉल स्टोन यांनी सांगितले. आपली टॅक्सी ही नियमकांद्वारे प्रमाणित पहिली उडणारी टॅक्सी असावी यासाठी व्होलोकॉप्टरची लिलियम, जॉबी एव्हिएशन आणि एरबस या कंपन्यांशी स्पर्धा सुरू आहे.