ChatGPT च्या उदयानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये याच्या वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे. एआय चॅटबॉटमुळे यूजर्स काम करताना मोठी मदत मिळत आहे. ऑफिसमध्ये याच्या वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. काहीजण मजा म्हणूनही चॅटजीपीटीचा उपयोग करत आहेत. ही सेवा उपभोगण्यासाठी लोकांना वेबसाइट उघडून त्यामध्ये वेब अ‍ॅडरेस टाइप करावा लागतो. पण वेब उघडून AI Chatbot वापरण्याकरिता प्रत्येक वेळी वेब अ‍ॅडरेस टाइप करणे त्रासदायक ठरु शकते.

हा त्रास कमी करण्यासाठी अ‍ॅप्पल कंपनीने watchGPT हा अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅपच्या मदतीने अ‍ॅप्पल वॉचेसमध्ये ChatGPT च्या सुविधेचा वापर करणे शक्य होणार आहे. हे अ‍ॅप अ‍ॅप्पल स्टोअरवर उपलब्ध आहे. कंपनीद्वारे या नव्या अ‍ॅपचा डेमो व्हिडीओ देखील लॉन्च करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वॉचजीपीटी बद्दलची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

हे अ‍ॅप अ‍ॅप्पल वॉचेसच्या होम स्क्रिनवर दिसणार आहे. स्क्रिनवर टॅप केल्यानंतर चॅटबॉट अ‍ॅक्टिव्ह होईल आणि कामाला सुरुवात करेल. सामान्यत: चॅटजीपीटीचा वापर करताना इंटरफेसमध्ये टाइप करावे लागते. अ‍ॅप्पलच्या वॉचजीपीटी अ‍ॅपमध्ये Voice command ही सुविधा उपलब्ध आहे. यूजर्स आवाजाच्या साहाय्याने चॅटजीपीटी कंट्रोल करु शकतात. त्याशिवाय या अ‍ॅपमध्ये टाइप करुन देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्नाना दिलेला प्रतिसाद मजकूर स्वरुपामध्ये पाहायला मिळतो. हा मजकूर एसएमएस, ईमेल आणि सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या माध्यमातून शेअर करता येतो.

आणखी वाचा – Google Translate मध्ये टाइप करण्याचे कष्ट वाचले; फोटोवरील मजकूराचे भाषांतर करण्यासाठी वापरावी ‘ही’ सोपी ट्रिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅप्पल वॉच नसलेले लोकदेखील ChatGPT चा वापर करु शकतात. गुगल क्रोममध्ये अनेक एक्सटेंन्सर उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने एआय चॅटबॉटची सेवा अनुभवता येते. यासाठी गुगल क्रोमच्या सेटिंग्समध्ये काही बदल करावे लागतात.