Gmail Unsubscribe scam alert : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना गेल्या काही दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. फसवणूक करणारे आरोपी वेगवेगळे मार्ग शोधून नागरिकांना गंडा घालताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी आणखी नव्या प्रकरच्या फसवणुकीबद्दल सावध राहण्याचा इशारा दिली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ईमेलवर अनेक प्रकारचे प्रोमोशनल ईमेल, खोट्या जॉब ऑफर्स आणि फीडबॅक रिक्वेस्ट पाठवल्या जात असतील. यामुळे तुमचा जीमेल स्टोरेज भरू लागतं आणि यापासून सुटका करून घेण्यासाठी आपण ईमेल ‘अनसब्सक्राइब बटण’ची मदत घेतो. तुम्ही देखील असेच काही करत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे. करण फसवणूक करणारे आता या अनसब्सक्राइब बटणचाच उपयोग तुम्हाला फसवण्यासाठी करत आहेत.

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, ईमेलमध्ये आपल्याला जो अनसब्सक्राइब लिंक दिसते ती नेहमीच खरी नसते. बऱ्याचदा फसवणूक करणारे तुम्हाला अशी लिंक पाठवून ईमेल अॅक्टिव आहे की नाही हे तपासतात. एकदा का तुम्ही अनसब्सक्राइब लिंकवर टॅप केलं की फसवणूक कराणाऱ्यांना लक्षात येते की हा ईमेल अॅक्टिव आहे, त्यानंतर हे आरोपी पुढील पावले टाकू लागतात.

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की अनोळखी सेंडरकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये अनसब्सक्राइब लिंक असेल तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका, असे केल्याने तुमचा फोन, लॅपटॉप किंवा ज्या डिव्हाईसवरून तुम्ही क्लिक केले आहे त्याचा एक्सेस फसवणूक करणाऱ्याकडे जाऊ शकतो. याशिवाय तुमची खाजगी माहिती देखील चोरी केली जाऊ शकते.

सायबर गुन्हेगार या लिंक्समध्ये ट्रॅकिंग कोड लावून त्या पाठवताता, ज्यामुळे तुमची अॅक्टिवीटी ट्रॅक केली जाते आणि याच कोडमुळे अकाउंट अॅक्टिव आहे की नाही याची माहिती देखील गुन्हेगारांपर्यंत पोहचते. तुम्ही लिंकवर क्लिक केलं की तुमच्या ईमेल हा अॅक्टिव असा मार्क केला जातो. सायबर सुरक्षा फर्म DNSFilter च्या विश्लेषणातून अशी माहिती समोर आली आहे की, जवळपास ६४४ अनसब्सक्राइब लिंक या वापरकर्त्यांना हानिकारक वेबसाईटवरती घेऊन जातात आणि यामध्ये तुमचा पासवर्ड देखील चोरी होण्याचा धोका असतो.

अशी घ्या काळजी

अनोळखी सेंडरकडून येणाऱ्या ईमेलवर क्लिक करण्याएवजी त्या ईमेलला स्पॅम असे मार्क करा, ज्यामुळे जीमेल पुढच्या वेळी तुम्हाला असे ईमेल येण्यापासून वाचवेल.

तुम्हाला जर पाठवणाऱ्यावर विश्वास नसेल तर ईमेलमध्ये दिसत असलेल्या अनसब्सक्राइब लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका.

हाईड माय ईमेल सारख्या प्रायव्हसी टूल्सचा वापर करा, हे टूल तुमच्या खरा ईमेल अड्रेस लपवून ठेवण्याचे काम करेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल अॅप आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेयर हे कायम अपडेट करत राहा, यामुळे अशा धोक्यांपासून तुमचे संरक्षण होईल.