scorecardresearch

Premium

चॅटिंग करणे होणार अधिक मजेशीर; WhatsApp ने iOs वापरकर्त्यांसाठी आणले ‘हे’ जबरदस्त फिचर

WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

whatsapp launch sticker feature for ios users
व्हाट्सअ‍ॅप (Image Credit- Indian Express)

WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. वापरकर्त्यांना Whatsapp वापरताना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स व अपडेट आणत असते. हे फिचर अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी असतात. आता असेच एक नवीन फिचर कंपनीने आयफोन (iOs) वापरकर्त्यांसाठी आणले आहे. हे फिचर नक्की काय आहे आणि कसे काम करते हे जाणून घेऊयात.

काय आहे हे नवीन फीचर ?

व्हॉट्सअ‍ॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाइट wabetainfo नुसार, WhatsApp ने iOS 16 वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांना स्टिकर्स बनवण्याचे फिचर मिळते. यासाठी ios वापरकर्त्यांना सब्जेक्टपासून फोटो वेगळा करून तो कोणत्याही चॅटमध्ये पेस्ट करून पाठवावा लागणार आहे. असे केल्याने हा फोटो त्यांच्या स्टिकर ऑप्शनमध्ये दिसेल. हे फिचर फक्त iOS 16 साठी रिलीज करण्यात आले आहे. तुम्हाला हे अपडेट जुन्या व्हर्जनमध्ये मिळणार नाही. वापरकर्ते इच्छित असल्यास, ते स्टिकरमध्ये मजकूर देखील जोडू शकतात.

flipkart's huge offer on iphone 15
ग्राहकांसाठी खुशखबर! iPhone वर मिळत आहे ‘इतक्या’ हजारांची सूट; काय आहे नेमकी ऑफर जाणून घ्या…
Flaxseeds Reduced Bad Cholesterol
नसांमध्ये जमलेला वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढतील ‘या’ बिया? कधी व किती सेवन करावे तज्ज्ञांकडून समजून घ्या…
Loksatta explained Why Confuse With New Option on Scholarship Website
विश्लेषण: शिष्यवृत्ती संकेतस्थळावरील नव्या पर्यायाने गोंधळ का उडाला?
the fire bolt wrist phone that looks like a smartwatch
अरेच्चा, Smartwatch आहे का स्मार्टफोन? ‘या’ डिव्हाईसमध्ये सोशल मीडिया ते गेमिंग सर्वांचा वापर करता येईल, पाहा…

हेही वाचा : Tech Layoffs: Meta मधून नोकरी गेलयावर कर्मचाऱ्याने लिंकडेनवर मांडली व्यथा; म्हणाला, “जो पर्यंत…”

वापरकर्त्यांचा अनुभव आणखी मजेदार करण्यासाठी WhatsApp ने एक नवीन फिचर आणले आहे. कंपनी आता तुम्हाला फोटो, व्हिडीओ, GIF आणि डॉक्युमेंटसह फॉरवर्ड करन्यायाची परवानगी देणार आहे. हे फिचर सध्या बीटा परीक्षकांसाठी आणले जाणार आहे. लवकरच ते सर्वांसाठी प्रसिद्ध केले जाणार आहे. या फीचरबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Meta च्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजच्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetainfo या वेबसाइटने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे , कंपनी बीटा परीक्षकांसाठी फॉरवर्डेड मेसेजचे फिचर आणत आहे. Google Play Store वरुन Android 2.23.8.22 अपडेटसाठी WhatsApp bita इंस्टाल केल्यावर असे दिसून आले, WhatsApp फॉरवर्ड केलेले फोटो, व्हिडीओ आणि GIF आणि डॉक्युमेंटसह डिस्क्रिप्शन लिहून फॉरवर्ड करण्याचे फिचर whatsapp आणत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Whatsapp rolle out sticker maker feature for iphone ios 16 users tmb 01

First published on: 20-04-2023 at 16:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×