व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर जारी केले आहे. यानुसार वापरकर्त्यांना व्हॉईस कॉल अंतर्गत एकाच वेळी ३२ लोकांना कनेक्ट करता येणार आहे. यापूर्वी व्हॉईस कॉलवर केवळ ८ लोक कनेक्ट होऊ शकत होते, परंतु आता त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयओएससाठी तयार केले गेले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस कॉल अंतर्गत तुम्ही एकाच वेळी ३२ लोकांना कसे कनेक्ट करू शकता हे जाणून घ्या.

कोविड-१९ महामारीच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगची मर्यादा ८ पर्यंत वाढवली होती. मात्र आता केवळ व्हॉईस कॉलवर ३२ लोक कनेक्ट करू शकणार आहेत. गूगल अँड्रॉइड आणि अँपल आयओएसवर रोलआउट होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एफएक्यू नवीन मर्यादेसह अपडेट केले गेले आहे

UPI Fraud : सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी पाच सोप्या स्टेप्स; आजच करा फॉलो

अपडेटेड एफएक्यू विभागात असे नमूद केले आहे की व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंग वापरून ३२ लोकांना एकमेकांशी विनामूल्य व्हॉइस कॉल करता येईल. अ‍ॅपल वापरकर्ते देखील नवीन कॉल मर्यादेचा वापरू शकतात. त्याच वेळी, अ‍ॅप स्टोअरवरील सूचीमधून अशी माहिती देखील प्राप्त झाली आहे की नवीन अपडेटमध्ये ३२ लोक ग्रुप कॉलिंगवर जोडले जाऊ शकतात.

एका व्हॉईस कॉलवर ३२ लोकांना जोडण्यासाठी नवीन डिझाइन सादर करण्यात आले आहे, त्यामध्ये सोशल ऑडिओ लेआउट, स्पीकर हायलाइट्स आणि वेवफॉर्म्ससह अपडेटेड इंटरफेस मिळतो.

Flipkart Month-End Mobiles Fest : अर्ध्याहून कमी किमतीत मिळत आहेत टॉप ब्रँडचे फोन्स; जाणून घ्या अधिक तपशील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये तुम्ही पूर्वीप्रमाणेच एक सामान्य व्हॉइस कॉल कराल आणि नंतर इतर वापरकर्त्यांचा कॉल उचलल्यानंतर तुम्ही वरच्या बाजूला दिसाल. अ‍ॅड पर्यायावर क्लिक करून, तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेल्या नंबरला किंवा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट केलेल्या लोकांना कॉल करू शकाल. अशा प्रकारे तुम्ही व्हॉईस कॉलवर एकाच वेळी ३२ लोकांना कनेक्ट करू शकता.