scorecardresearch

स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

बाजारात अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात.

smartphones news
SmartPhones Tips – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत असतो. तसेच हा स्मार्टफोन आजकाल काळाची गरज बनला आहे. आपण शक्यतो २ ते ३ वर्षांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करत असतो. बाजारात अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट बजेटमध्ये फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये अनेक कंपन्यांचे फोन्स दिसून येतात. त्यामुळे तुम्हाला कोणता फोन खरेदी करायचा हा प्रश्न निर्माण होतो. फोन खरेदी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत. या टिप्स तुम्हाला योग्य स्मार्टफोन निवडण्यात आणि खरेदीसाठी खूप मदत होणार आहेत. या कोणत्या टिप्स आहेत हेपण जाणून घेऊयात.

फोनसाठी योग्य बजेट सेट करा

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी त्याचे योग्य असे बजेट निवडणे आवश्यक असते. यामुळे तुमचा निम्मा प्रॉब्लेम दूर होतो. जर तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल आणि सामान्य वापरासाठी स्मार्टफोन घ्यायचा असेल , तर तुमच्यासाठी १५ ते २० हजारांचा फोन हा सर्वोत्तम पर्याय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गेमिंग आणि फोटोग्राफी आवड असेल तर तुम्ही तुमचे बजेट वाढवू शकता.

हेही वाचा : 6 G Technology: टेलिकॉम सुरक्षेविषयी क्वाड देशांनी चिंता व्यक्त केली; म्हणाले, “राष्ट्रीय…”

तसेच काही लोकांना टॉप आणि फ्लॅगशिपचे स्मार्टफोन्स घ्यायला आवडते त्यांच्यासाठी ५० ते ६० हजारांचे बजेट हे योग्य बजेट आहे. मात्र फोनचे बजेट ठरवण्यापूर्वी हे लक्षात घ्या की, कोणताही फोन हा परिपूर्ण नसतो. पुढील २ ते ३ वर्षात अत्याधुनिक फीचर्स असलेले फोन बाजार लाँच होणार आहेत. तुम्हाला फोन खरेदी करण्यासाठी बजेट सेट करावे लागणार आहे.

कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याचा प्राधान्यक्रम आणि उद्देश निश्चितपणे ठरवणे आवश्यक आहे. तुम्हाला फोन कोणत्या कामासाठी घ्यायचा आहे जसे की, गेमिंग , कॅमेरा , चांगली बॅटरी लाईफ , चांगला डिस्प्ले इत्यादी गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी फोन घ्यायचा असेल, तर तुम्ही फोनचा चांगला कॅमेरा पहिल्या प्राधान्यावर ठेवू शकता आणि इतर फीचर्स सरासरी ठेवून फोन निवडू शकता.

हेही वाचा : केवळ ३० हजारांमध्ये मिळतोय Samsung चा १ लाख रुपयांचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, फ्लिपकार्टवर मिळतेय भरघोस सूट

जर तुम्ही फोन गेम खेळण्यासाठी घेत असाल तर तुम्ही फोनचा प्रोसेसर आणि रॅम प्राधान्याने पाहणे आवश्यक आहे. दुसरीकडे तुम्ही गेम खेळत नसल्यास या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकता. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुमचे प्राधान्य ठरवा आणि त्यानुसार फोन खरेदी करा त्यामुळे तुमचे अधिकचे पैसे वाचू शकतात.

लेटेस्ट फीचर्सचे स्मार्टफोन

स्मार्टफोन खरेदी करताना हे लक्षात ठेवा की, तुम्ही जो फोन घेणार आहात त्याची टेक्नॉलॉजी आणि फीचर्स किमान दोन वर्षे ट्रेंडमध्ये असणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या काळात तुम्ही ५जी कनेक्टिव्हिटी असलेला फोन खरेदी करावा. नवीन स्मार्टफोन्स खरेदी करण्यापूर्वी मार्केट ट्रेंड आणि नवीन फीचर्सची सुद्धा माहिती घेणे आवश्यक आहे.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

सध्या फोनच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये फोनची किंमत कमी करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या फीचर्समध्ये कपात करत आहे. पूर्वी एखाद्या स्मार्टफोनला १० हजार रुपयांच्या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले मिळत होता आणि आता अनेक कंपन्या २० हजार रुपयांच्या फोनमध्येही LCD डिस्प्ले देत आहेत..त्यामुळे तुम्ही फोन खरेदी करताना त्याच्या फीचर्स आणि चांगला डिस्प्ले निवडणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 19:05 IST