Smartphone Tricks: देशात सगळीकडे आता फेस्टिव्ह सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे स्मार्टफोन आता बऱ्याच सवलतींसह कमी दरात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेकजण या ऑफरचा उपयोग करून नवीन फोन घेण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हालाही नवीन फोन खरेदी करायचा असेल मात्र, हे स्मार्टफोन तुमच्या बजेटच्या बाहेर असतील. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुमचा फोन खरंच खराब झाला असेल किंवा बिघडला असेल तर तुम्हाला नवीन फोन घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, तुमचा फोन चालू स्थितीत असेल तर तुम्ही त्या फोनचा वेग वाढवून त्याला नव्यासारखा बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या ही जबरदस्त ट्रिक्सबद्दल.

नको असलेले अॅप्स अनइंस्टॉल करा

आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप्स असतात. त्यातील काही आपण कायम वापरतो. तर तुम्ही जे अॅप्स नियमित वापरता ते सोडून नको असलेले अॅप्स तुमच्या फोनमधून डिलीट करा. त्याचप्रमाणे तुमच्या फोनची मेमरी ज्या अॅप्समुळे भरते त्यांना लगेच अनइन्स्टॉल करा. जर तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम सारखे अॅप्सचा वापर जास्त करत असाल, तर त्यांचे लाईट व्हर्जन वापरा. तुमच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन तुम्हाला ते सहज मिळतील. या लाईट व्हर्जन अॅप्समुळे तुमच्या फोनमध्ये बरीच जागा रिकामी होईल.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

( हे ही वाचा: तुमच्या नावावर किती Sim Card ॲक्टिव्ह आहेत; फक्त एका मिनिटात जाणून घ्या)

दररोज फोन रीस्टार्ट करा

तुमचा फोन दररोज रिस्टार्ट करा त्याने तुमच्या फोनमधील रॅम मोकळी होते तसंच अॅप्स देखील रिस्टार्ट होतात. जर तुमच्या फोनची रॅम कमी असेल तर तुम्ही दिवसातून एकदा तरी फोन रिस्टार्ट करा. आयफोन मध्ये सेटिंग्ज > बॅटरी > बॅटरी हेल्थ वर जाऊन बॅटरीचे वृद्धत् कमी करण्यासाठी ऑप्टिमाइज्ड बॅटरी चार्जिंग सक्षम करा. सॅमसंग साठी सेटिंग्ज > डिव्हाइस केअर > Optimize Now वर जा, तसंच Galaxy Phones मध्ये “Protect Battery” पर्याय असेल जो चार्जेस ८५ % पर्यंत मर्यादित करतो.

फॅक्टरी रीसेट करा

जर सर्व ट्रिक्स वापरल्यानंतर तुमच्या फोन आहे त्या स्थितीत असेल तर काही शेवटची पद्धत म्हणजे फॅक्टरी रीसेट. या ट्रिक्सने तुमचा फोन पूर्णपणे नवा होईल. म्हणजेच, नवा फोन घेताना जे तेच अॅप्सचा असतील तसेच या फॅक्टरी रिसेट केल्याने येईल. मात्र, यात तुमचा सर्व डेटा डिलीट होऊन जाईल. त्यामुळे जर तुम्ही फॅक्टरी रिसेट करत असाल, तर त्याआधी तुमचे सर्व फोटो, व्हिडिओ आणि कॉन्टॅक्ट्सचा बॅकअप घ्या.

( हे ही वाचा: IPhone 11 मिळतोय २५,००० पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची जबरदस्त ऑफर)

फोन चार्ज करण्याच्या पद्धतीत बदल करा

तुम्ही फोन चार्ज करतेवेळी १००% पर्यंत बॅटरी चार्ज करू नका त्याचप्रमाणे १५ टक्के पेक्षा कमी बॅटरी देखील ठेवू नका यामुळे तुमचा फोन लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन चार्ज करते ८०% पर्यंत फोन चार्ज करा यामुळे तुमची बॅटरी लाइफ देखील चांगली राहील. जर चार्जिंग केबल खराब झाली असेल. जर तुम्ही अशा पद्धतीने फोन चार्ज केलात तर तुम्हाला नवीन फोन घेण्याची गरज भासणार नाही.

नवीन सॉफ्टवेअर तपासा

अनेक जण अपडेट्स कडे लक्ष देत नाही. पण, सॉफ्टवेरर अपडेट्स मुळे फोनमध्ये अनेक चांगले आणि मह्त्वाचे बदल होतात. Apple च्या iOS आणि Google च्या Android सॉफ्टवेअरसाठी नवीन अद्यतने डाउनलोड करा. हे अपडेट केल्याने जुने डिव्‍हाइस पुन्हा नवीन वाटू शकतात. यासाठी सेटिंग्ज अॅपमध्ये तुमची अँड्रॉईड आवृत्ती तपासा आणि अपडेट करा.