लॅपटॉपमध्ये व्हॉटसअ‍ॅप वापरायचे असेल तर आपल्याला आधी ते फोनशी जोडावे लागते. म्हणजे लिंक शेअर करुन, स्कॅन करून आपण फोन आणि लॅपटॉप दोन्ही ठिकाणी व्हॉटसअ‍ॅप वापरू शकत होतो. पण आता ही पद्धत न वापरता थेट लॅपटॉपमध्ये व्हॉटसअ‍ॅप इतर ॲप्सप्रमाणे वापरता येणार आहे. हे एका नव्या ॲपमुळे शक्य झाले आहे. हे कोणते ॲप आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत जाणून घेऊया.

व्हॉटसअ‍ॅपच्या संकेतस्थळावर विंडोज वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. विंडोज वापरकर्ते व्हॉटसअ‍ॅप नव्या ‘स्टॅंड अलोन’ या ॲपद्वारे सहजरित्या, कोणत्याही लिंकशिवाय डेस्कटॉपवर व्हॉटसअ‍ॅप वापरू शकतील. म्हणजेच विंडोज वापरकर्त्यांसाठी आता व्हॉटसअ‍ॅप स्वतंत्र ॲप म्हणून उपलब्ध आहे.

Location Tracking : मोबाईलमधून ‘या’ पद्धतीने तुम्ही करू शकता कोणाचेही लोकेशन ट्रॅक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हॉटसअ‍ॅपच्या या नव्या फिचरमुळे तुम्हाला यापुढे मेसेज पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी तुमचा फोन लिंक करावा लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या लॅपटॉपवर ‘स्टॅंड अलोन’ हे ॲप डाउनलोड करायचे आहे. इतर कोणत्याही ॲपप्रमाणे तुम्ही हे ॲप ऑपरेट करू शकता. या ॲपचा बीटामध्ये समावेश नाही, याबद्दल व्हॉटसअ‍ॅपने माहिती दिली आहे. हे नवे ॲप मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.