गुगलने सप्टेंबर २०२० मध्ये युट्यूब शॉर्ट्स लाँच केले होते. युट्यूब शॉर्ट्स हे टिकटॉक सोबत स्पर्धा करण्यासाठी सादर करण्यात आले होते. आज शंभरहून जास्त देशांमध्ये वापरले जात आहे. युजर्स युट्यूब शॉर्ट्सवर ६० सेकंदाचे व्हिडीओ बनवले जातात. लाँच दरम्यान यूट्यूब शॉर्ट्समध्ये फारच कमी फीचर्स देण्यात आले होते. मात्र आता यात कलर करेक्शन, फिल्टर्स आणि ऑटोमॅटिक कॅप्शन सारखे फीचर्सही दिले आहेत. कंपनी आता युट्यूब शॉर्ट्समध्ये व्हॉईस ओव्हर फीचर देखील देणार आहे. सध्या कंन्टेंट क्रिएटर्सना युट्यूबच्या लायब्ररीतून ऑडिओ घ्यावा लागत आहे.

XDA डेव्हलपर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, युट्यूब शॉर्ट्स अ‍ॅपसाठी व्हॉइस-ओव्हरची चाचणी करत आहे. चाचणी अ‍ॅपची एपीके फाइल देखील समोर आली आहे. व्हॉईस ओव्हर फीचर यूट्यूब शॉर्ट्स बीटा व्हर्जन १७.०४.३२ वर पाहाण्यात आले आहे. यूजर्सना व्हॉईस ओव्हरसाठी वेगळे बटण मिळेल. सध्या, कस्टम ऑडिओ क्लिप जोडण्यासाठी कंटेन्ट क्रिएटर्सना थर्ड पार्टी व्हिडिओ एडिटर वापरावा लागेल. यूट्यूबने या क्षणी नवीन फीचरबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

Google Investment In Airtel: गुगलची १०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक, एअरटेलसोबत मिळून स्वस्त स्मार्टफोनची निर्मिती करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्सला खूप फायदा झाला आहे. सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत इंस्टाग्रामने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी, युट्युबने निर्मात्यांसाठी ७३५ कोटींचा निधी जारी केला होता.