युट्यूब हे लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना आपल्या आवडत्या व्यक्तींचा कंटेन्ट, व्हिडीओ सहजरित्या उपलब्ध होतात. तसेच कंटेन्ट क्रिएटर्सना देखील त्यांच्या जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचता येते. एखादे गाणे आपल्याला आठवते किंवा एखादी ट्युन आपण नकळत गुणगुणतो आणि ते गाणे लगेच ऐकण्याची इच्छा होते, तेव्हा लगेच आपण युट्यूबवर आपण ते सर्च करून पाहतो, ऐकतो. अशाचप्रकारे एखाद्या आवडत्या चित्रपटाचा सीन, नाटकामधील एखादे पात्र आठवते आणि आपण लगेच ते पुन्हा अनुभवण्यासाठी आपण युट्यूबचा आधार घेतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युट्यूबवर अगदी बडबडगीतांपासून ते सर्वात लोकप्रिय पॉडकास्टपर्यंत सर्व कंटेन्ट उपलब्ध होतो. त्यामुळेच लहान मुलांपासून जेष्ठ मंडळींपर्यंत सर्वांनाचं युट्यूब आवडते आणि सहजरित्या वापरता देखील येते. युट्यूबवर आपण आपल्या आवडीच्या कंटेन्टचा कितीही वेळा आनंद घेऊ शकतो. यातील सर्वांना खटकणारी गोष्ट म्हणजे जाहीराती. कोणताही व्हिडीओ सुरू होण्याआधी जाहिराती सुरू झाल्यावर ते संपेपर्यंत वाट बघावी लागते. कधीकधी तर या जाहिराती स्किप करता येत नाहीत. त्या जाहिराती संपेपर्यंत वाट बघणे सर्वांना खटकते. त्यातच आता वापरकर्त्यांना आणखी कंटाळवाणी वाटणारी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे लवकरच युट्यूबवर व्हिडीओ सुरू होण्याआधी पाच जाहिराती दिसणार आहेत.

आणखी वाचा : तुमचे गूगल अकाउंट सुरक्षित आहे का? ‘२ स्टेप व्हेरीफिकेशन’ प्रक्रिया काय आहे जाणून घ्या

पाच जाहिरातींमुळे वापरकर्ते नाराज
युट्यूबवर व्हिडीओ सुरू होण्याआधी पाच जाहिराती दिसण्यास सूरवात झाली आहे आणि वापरकर्ते याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक जणांनी ट्विटरवर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा! कोणती कंपनी देतेय ही ऑफर जाणून घ्या

कंपनीने दिले याबाबत स्पष्टीकरण
ट्विटरवर जाहिरातीबाबत नाराजी व्यक्त केलेल्या ट्वीटला युट्यूबने रिप्लाय देत स्पष्टीकरण दिले आहे. यावर युट्यूबने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘विशिष्ट प्रकारच्या जाहिरातीच्या फॉरमॅटबरोबर हे होऊ शकते, ज्याला ‘बंपर ऍड्स’ म्हटले जाते. यातील प्रत्येक जाहिरात केवळ ६ सेकंदाची असणार आहे. म्हणजे एखादा व्हिडीओ सुरू होण्याआधी एकुण जाहिरातींचा वेळ ३० सेकंदाचा असू शकतो. तसेच याबाबत वापरकर्ते ‘सेंड फिडबॅक’ या पर्यायावरून फिडबॅक नोंदवू शकतात.’

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtube starts 5 unskippable ads users questions on twitter see companys reply pns
First published on: 16-09-2022 at 19:05 IST