नेटीझन्समध्ये संवादाचे लोकप्रिय माध्यम असलेल्या फेसबुकने आपल्या युजर्ससाठी नवी सुविधा सुरू केली आहे. फेसबुकने ‘मॅसेज रिक्वेस्ट फिचर’ आणले असून यामाध्यमातून आपल्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला मॅसेज पाठवणे किंवा अशा व्यक्तीकडून आलेले मॅसेज नाकारण्याची सुविधा फेसबुकने उपलब्ध करून दिली आहे.

अनेकदा आपल्याला एखाद्या व्यक्तीला मॅसेज करायचा असतो पण ती व्यक्ती आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये नसल्याने मॅसेज करता येत नाही. युजर्सची ही समस्या फेसबुकने या आपल्या नव्या सुविधेतून सोडवली आहे. तुम्ही तुमच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला मॅसेज करू शकता पण, हा मॅसेज तुम्ही ज्या व्यक्तीला पाठवला आहे, त्याच्या ‘Other’ नावाच्या फोल्डरमध्ये जाईल. हा मॅसेज समोरच्या व्यक्तीला पाहण्याची किंवा मॅसेज नाकारण्याची सुविधा आहे.
फेसबुक पेजच्या मॅसेज सेक्शनमध्ये हा ‘Other’ मॅसेजचा फोल्डर आहे. या फोल्डरमध्ये आलेले मॅसेज वाचण्याची, मॅसेज पाठवणाऱयाचे नाव तसेच इतर माहिती देखील मिळवता येणार आहे. तसेच एखाद्याने पाठवलेले मॅसेज आपल्याला यापुढे नको असतील तर ते नाकारण्याचीही सुविधा यात देण्यात आली आहे.