जगातील करोडो इंटरनेट वापरकर्ते वेब ब्राऊझर म्हणून क्रोमचा वापर करतात. गुगलने २००८ मध्ये हे ब्राऊझर बाजारात आणले आणि लोकांसाठी ते मोफत उपलब्ध करून दिले. हे ब्राऊझर लोकांनी जास्तीत जास्त वापरावे यासाठी ते सुरुवातीपासूनच साधे आणि कमीत कमी इंटरनेट खर्च होईल असे विकसित करण्यात आले होते; पण यामध्ये काही अद्ययावत सुविधाही देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमचे इंटरनेट ब्राऊझिंग अधिक चांगले व सुरक्षित करू शकता.

पाहुणा ब्राऊझर

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट

आपला लॅपटॉप जर कुणी मागितला, तर त्यात आपण साठवलेली महत्त्वाची माहिती पाहू नये यासाठी ज्याप्रमाणे आपण वापरकर्त्यांमध्ये ‘पाहुणा’ (गेस्ट) हा पर्याय ठेवतो. त्याचप्रमाणे आपल्या ब्राऊझिंगच्या गोष्टी लोकांनी पाहू नये यासाठी गुगल क्रोममध्ये आपण ब्राऊझिंगसाठीही ‘पाहुणा’ (गेस्ट) वापरकर्त्यांचा पर्याय आहे. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ‘पीपल’ हा पर्याय निवडावा लागेल तेथे ‘एनेबल गेस्ट ब्राऊझिंग’ हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही क्रोम लॉगइन केल्यावर उजव्या बाजूला येणाऱ्या तुमच्या वापरकर्ता नावावर क्लिक करून तुम्ही ‘स्विच पर्सन’ हा पर्याय वापरून ब्राऊझर पाहुण्या वापरकर्त्यांसाठी खुला करून देऊ शकता.

बुकमार्क बार

क्रोमचा बुकमार्क बार हा खूपच लवकर भरतो, पण त्यानंतरही आपल्याला अनेक संकेतस्थळे बुकमार्क करून ठेवायची गरज असते; पण ते केल्यानंतरही ते संकेतस्थळ त्या बुकमार्क बारवर दिसत नाहीत. जर तुम्हाला ते संकेतस्थळ दिसावे असे वाटत असेल तर तुम्ही क्रोममध्ये बुकमार्क मॅनेजरमध्ये जा. तेथे सर्व बुकमार्कचे टायटल फिल्ड डिलीट करा. हे करत असताना लिंक डिलीट होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर तुम्हाला त्या संकेतस्थळाचा छोटा लोगो दिसू लागेल.

ओमनी बॉक्स अधिक सक्षम करा

तुमच्या ब्राऊझरचा ओमनी बॉक्स अर्थात आपण जेथे संकेतस्थळाचा पत्ता देतो ते ठिकाण अधिक सक्षम करता येणे शक्य आहे. म्हणजे यामध्ये आपण एखादे गणित सोडविण्यापासून ते एकक रूपांतरही करू शकतो. यासाठी गुगल सर्चमध्ये जाऊन एखादे संकेतस्थळ शोधून रूपांतर करण्याची गरज भासणार नाही. म्हणजे आपण त्या चौकटीत ‘५ फूट ते इंचेस’ असे टाइप केल्यावर आपल्याला उत्तर मिळू शकणार आहे. अनेकदा आपल्याला उत्तर आपण ‘एन्टर’ बटण दाबण्यापूर्वीच मिळू शकणार आहे. या माध्यमातून आपण तापमान, अंतर आणि वजन अशा गोष्टींची माहिती मिळवू शकतो.

संकेतस्थळ भेटीबद्दल अधिक माहिती

तुम्ही एखाद्या संकेतस्थळाचा पत्ता टाकल्यावर ते सुरू होते. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक चिन्ह दिसते. त्या चिन्हावर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही जे संकेतस्थळ पाहात आहात त्यात किती माहिती आहे, त्याची सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे, हे संकेतस्थळ कुणी तयार केले आहे याचबरोबर संकेतस्थळांत किती ‘कूकीज’ आहेत याचा तपशील मिळू शकणार आहे. ही माहिती आपण एखाद्या अनोळखी संकेतस्थळाला भेट देत असताना उपयोगी ठरू शकते.

खूप मागे जाण्यासाठी

आपण इंटरनेटचा वापर करत असताना एकामागून एक संकेतस्थळे सुरू करत असतो. साधारणत: एखाद तास इंटरनेटचा वापर केल्यानंतर आपण सर्वप्रथम जे संकेतस्थळ पाहिले होते त्या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आपल्याला वाटते. अनेकदा आपण वेगवेगळय़ा संकेतस्थळांवरून लिंक सुरू केलेल्या असतात. यामुळे आपल्याला त्या संकेतस्थळांचा पत्ता माहिती नसतो. अशा वेळी ते शोधून काढण्यासाठी ‘बॅक’चा पर्याय वापरला जातो. मात्र आपण किती वेळ हा पर्याय वापरणार. हे टाळण्यासाठी ‘बॅक’ या पर्यायावर बराच वेळ क्लिक करून ठेवा. तेथे तुम्हाला तुम्ही भेट दिलेल्या संकेतस्थळांच्या लिंक्स दिसतील. त्यातील तुम्हाला पाहिजे ती लिंक तुम्ही निवडू शकता.

शब्दार्थ जाणण्यासाठी

आपण संकेतस्थळावर लेख किंवा पुस्तकातील काही तपशील वाचत असतो. हे वाचत असताना एखादा शब्द जर आपल्याला अडला, तर त्याचा अर्थ पाहण्यासाठी तो कॉपी करून डिक्शनरीसारख्या संकेतस्थळावर जाऊन त्याचा अर्थ शोधतो; पण गुगल क्रोममध्ये तुम्ही ‘गुगल डिक्शनरी’ या टूलचा वापर करून तुम्ही तुम्हाला अडलेल्या शब्दावर दोन क्लिक केल्यावर त्यावर एका चौकटीत तुम्हाला त्याचा अर्थ समजू शकणार आहे. यासाठी तुम्हाला गुगलचा हा टूल सक्रिय करून घ्यावा लागणार आहे.

टास्क मॅनेजर

तुम्ही वेगवेगळय़ा टॅबमध्ये विविध संकेतस्थळे सुरू करता. अनेकदा एका टॅबवरील संकेतस्थळावर ट्रबल शूटिंगसारखी अडचण येते. त्या वेळेस तुम्हाला अनेकदा ब्राऊझर बंद केल्याशिवाय पर्याय राहात नाही. अशा वेळी तुम्ही क्रोमच्या टास्क मॅनेजरमध्ये जाऊन ते संकेतस्थळ निवडून त्याची प्रक्रिया थांबवू शकता. यामुळे तुम्हाला मुख्य टास्क मॅनेजर सुरू करून संपूर्ण क्रोम बंद करण्याची गरज पडणार नाही.

सगळे सिंक करण्याची गरज नाही

क्रोम वापरत असताना अनेकदा आपले पासवर्ड आणि ब्राऊझिंग हिस्ट्री ही त्या उपकरणात साठवून ठेवली जाते; पण हे सर्व सिंक करण्याची अर्थात साठवण्याची तशी गरज नसते. यामुळे तुम्ही सॅटर्डड सेटिंग्जच्या पानावर जा. तेथे अ‍ॅडव्हान्स्ड सिंक सेटिंग्ज हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला काय सिंक करून हवे आहे तेवढेच पर्याय निवडा. उर्वरित पर्याय काढून टाका, जेणेकरून तुमची माहिती सिंक होणार नाही व ती त्या उपकरणात साठवूनही ठेवली जाणार नाही.