News Flash

मोबाइल इंटरनेटचा वापर जरा जपून!

भारतीय बाजारातील स्मार्टफोनच्या वाढत्या वापरकर्त्यांसोबत इंटरनेटच्या वापराचेही प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मोबाइलवरील खर्चात विशेषत: बिलामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे.

| November 16, 2014 12:06 pm

भारतीय बाजारातील स्मार्टफोनच्या वाढत्या वापरकर्त्यांसोबत इंटरनेटच्या वापराचेही प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मोबाइलवरील खर्चात विशेषत: बिलामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. अलीकडेच मोबाइल इंटरनेट वापराच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर मोबाइल इंटरनेटचा वापर नियंत्रितपणे कसा करावा आणि मोबाइल डाटावापरावरील खर्च कमी कसा करावा, याविषयी काही टिप्स:
मोबइल इंटरनेटचा वापर आणि त्यावर होणारा खर्च ही सध्या प्रत्येकासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे. भारतात मोबाइल इंटरनेटचा प्रसार करण्यासाठी कंपन्यांकडून सुरुवातीला अनेक आकर्षक ऑफर दिल्या जातात. मात्र, एकदा ऑफर्सचा कालावधी संपला की मग होणारा इंटरनेट डाटावापराचा
खर्च अनेकांना बुचकळय़ात पाडतो. आपण इंटरनेटचा
एवढा वापर करत नसतानाही एवढा खर्च कसा होतो, असा प्रश्नही अनेकांना सतावतो. परंतु, आपल्या कळत वा नकळत अनेक अॅप्स आपल्या मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून डाटा वापरत असतात. फेसबुक, ट्विटर, यूटय़ुब या अॅप्लिकेशन्सकडून होणाऱ्या डाटाचा अमर्याद वापर याचेच उदाहरण आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर, खिशावर अधिक भार पडू न देता नियोजनबद्धतेने मोबाइल इंटरनेट कसे वापरावे, हे पाहणे आवश्यक बनले आहे.
tech-01मोबाइल/टॅब्लेटचे सेटिंग तपासा:
स्मार्ट फोनमुळे प्रत्येकाला मोबाइलवरूनच आपला ईमेल पाहता, पाठवता येतो. अँड्रॉइड फोनमध्ये जी मेल आयडी वापरावाच लागत असल्याने तेथे आपला जी मेल सदैव ‘अॅक्टिव्ह’ असतो. तर, बऱ्याचदा आपण आपल्या सोयीसाठी ईमेल किंवा कॅलेण्डर ‘सिन्क’ करून घेतो. ‘सिन्क’ किंवा एकसूत्रीकरणामुळे ईमेलचा वापर अधिक उपयुक्त ठरतो.
मात्र, त्याचा परिणाम डाटाचा वापर वाढण्यातही होतो.
त्यामुळे आपल्या मोबाइल किंवा टॅब्लेटच्या सेटिंगमध्ये
जाऊन ‘ऑटो सिन्क’चा पर्याय बंद करून ‘मॅन्यूअल सिन्क’ सुरू ठेवा. त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हाच तुमचा ‘ई मेल’  सिन्क करता येईल. तुम्ही तुमच्या ई मेलच्या सेटिंगमध्येही बदल
करू शकता. जेणेकरून मोबाइलवर तुम्हाला केवळ नव्या ईमेलच्या ‘सब्जेक्ट’ आणि पाठवणाऱ्याचीच माहिती दिसेल. त्यामुळे तो ईमेल तातडीने पाहायचा असेल तरच, तो तुम्हाला ओपन करता येईल.
नको असल्यास ‘मोबाइल डाटा’ बंद ठेवा:
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे इंटरनेटचा वापर २४ तास होत असतो. मात्र, या २४ तासांतही काही तास असे असतात, जेव्हा तुम्हाला इंटरनेटची गरज नसते. विशेषत:  गाडी चालवत असताना, एखाद्या मिटिंगमध्ये असताना, झोपताना तुम्ही तुमचा ‘मोबाइल डाटा’ बंद ठेवू शकता. अगदी १५ मिनिटांसाठी ‘मोबाइल डाटा’ बंद ठेवला तरी तुमची बरीच बचत होऊ शकते.
tech-02‘वायफाय’ वापरा, अपडेट रहा
स्मार्ट फोनवर अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतरही वारंवार त्यात बदल होत असतात. हे बदल किंवा अपडेट करण्यासाठी आपल्याला ‘नोटिफिकेशन्स’ही दिसतात. मात्र, अपडेट करण्याच्या प्रक्रियेत बराच मोबाइल डाटा वापरला जातो. त्यामुळे सर्वात प्रथम कोणतेही अॅप्लिकेशन ‘वायफाय’मध्ये असतानाच अपडेट करा. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘वायफायमध्येच ऑटो अपडेट’चा पर्याय निवडा. तुम्ही ‘ऑटो अपडेट’चा पर्याय बंदही ठेवू शकता व शक्य असेल तेव्हा ‘मॅन्युअली अपडेट’ करू शकता. मात्र, ‘मॅन्युअल अपडेट’ची प्रक्रियाही वेळखाऊ असू शकते.
पडद्यामागचा ‘डाटावापर’ कमी करा
तुम्ही इंटरनेटवर आधारित कोणतेही अॅप वापरत नसता, तेव्हाही तुमचा मोबाइल डाटा खात असतो. याचे कारण तुमच्या अपरोक्ष अनेक अॅप्लिकेशन्स tech-03बंद असतानाही मोबाइल डाटाचा वापर करत असतात. तुमच्याकडे अँड्रॉइडचे आइस्क्रीम, सँडविच किंवा त्यापेक्षा वरची आवृत्ती असेल तर कोणते अॅप्लिकेशन अधिक डाटा वापरते, हे तुम्हाला सहज कळू शकते. त्यानुसार तुम्हाला संबंधित अॅपवरील ‘बॅकग्राउंड डाटा’चा वापर रोखता येईल.
डाटा वापरावर लक्ष ठेवा
मोबाइल इंटरनेटच्या वापरावर नियंत्रण ठेवणारे अनेक अॅप्स सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. शिवाय अँड्रॉइडच्या फोनमध्येही तशी सुविधा पुरवण्यात आली आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे डाटा वापराची मर्यादा निश्चित करू शकता. ही मर्यादा वापरलेला डाटा किंवा त्याची किंमत या दोन्ही प्रकारांनी निश्चित करता येते. ‘डाटा वापरा’वर नियंत्रण ठेवणारे अनेक अॅप्स तुम्हाला वेळोवेळी ‘डाटाखाऊ’ अॅप्लिकेशन्सबद्दल सतर्कही करत tech-04असतात. शिवाय तुम्ही ठरवलेल्या मर्यादेच्या ८० टक्क्यांपर्यंतचा वापर झाला की तुम्हाला इशारा दिला जातो. याचा खूप फायदा होतो.
मोबाइल वेबसाइटच वापरा
कॉम्प्युटरसाठी तयार केलेली संकेतस्थळे मोबाइलवर ओपन केल्यास ते भरपूर डाटा वापरतात. त्यामुळे खास मोबाइलसाठी बनवलेल्या वेबसाइटचाच अधिक वापर करा. सध्या बहुतांश महत्त्वाच्या वेबसाइट्स मोबाइल पोर्टलदेखील असतात. त्यावर जाहिराती, फ्लॅश किंवा छायाचित्रे कमी असतात. त्याचा थेट फायदा होतोच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 12:06 pm

Web Title: while using internet on mobile be careful
टॅग : Tech It,Technology
Next Stories
1 प्रवासी अ‍ॅप्स
2 ब्रदर इंडियाचे प्रिंटर्स
3 लज्जतदार लॉलीपॉप
Just Now!
X