प्रश्न – मी आठवीत शिकत असून माझ्या वडिलांनी मला त्यांचा जुना फोन दिला आहे. त्यामध्ये मला दिवाळीच्या सुट्टीत खेळता येतील असा अॅक्शन गेम सुचवा.
– वेद प्रभुदेसाई
उत्तर – तुम्हाला ड्रॅगनच्या काळातील काही वस्तूंची माहिती हवी असेल आणि त्या तुम्हाला पाहावयाच्या असतील तर तुम्हाला हिरोज ऑफ ड्रॅगन एज हा गेम उपयुक्त ठरू शकतो. ड्रॅगनच्या विश्वात जाऊन त्याच्याकडील साठा आपल्याकडे आणायचा हा या गेमचा मुख्य गाभा आहे. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या रणनीती तयार कराव्या लागतात. ड्रॅगनपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करावी लागते. अखेर ड्रॅगनपर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्याकडे देण्यात आलेली विविध शस्त्रे आणि वाटेत तुम्ही मिळवलेली शक्ती या माध्यमातून तुम्हाला ड्रॅगनशी युद्ध करून त्याचा खात्मा करावयाचा आहे. याशिवाय अॅक्शनमध्ये डेड ट्रिगर्स २, अस्फाल्ट ८: एअरबॉर्न, स्पेस टीम, मॅजिक २०१४, ड्रॅगन हंटर ४, गॅलक्सी ऑन फायर २एचडी, वेक्टर यांसारख्या गेम्सचा पर्याय खुला आहे.
या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2014 रोजी प्रकाशित
Tech नॉलेज :दिवाळीच्या सुटीसाठीमोबाइल गेम सुचवा
तुम्हाला ड्रॅगनच्या काळातील काही वस्तूंची माहिती हवी असेल आणि त्या तुम्हाला पाहावयाच्या असतील तर तुम्हाला हिरोज ऑफ ड्रॅगन एज हा गेम उपयुक्त ठरू शकतो.

First published on: 17-10-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suggest mobile games on the occasion of diwali vacation