25 September 2020

News Flash

टेकन्यूज : व्हॉट्सअ‍ॅपरील नवीन फीचर

भारतात इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपचे जवळपास २० कोटी वापरकर्ते आहेत.

व्हॉटसअ‍ॅप

भारतात इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपचे जवळपास २० कोटी वापरकर्ते आहेत. या लेखात आपण अनेकांच्या जिव्हाळ्याचं बनलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरील नवीन उपयोगी फीचरचा ऊहापोह करू या !

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवा पैसे

भारतात गुगल बँकेबरोबर भागीदारी करून पेमेंट सव्‍‌र्हिस सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी गुगलला आरबीआयकडून मान्यता मिळणे बाकी आहे. २०१६ मध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआई सव्‍‌र्हिसची सुरुवात केली होती. यामुळे मोबाइल वापरकर्ते या पद्धतीचा वापर करून दोन बँका दरम्यान निधी हस्तांतरण करू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप हा पहिला मोबाइल अ‍ॅप असेल जो डिजिटल पेमेंटसाठी मल्टी बँक पार्टनरशिपसोबत काम करेल, कारण भारतामध्ये व्हॉट्सअ‍ॅपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने व्हॉट्सअ‍ॅपला पैसे हस्तांतरण सेवेला मंजुरी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे आणि २० कोटी पेक्षाही जास्त वापरकर्ते आहेत. ते आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपचा वापर चॅटिंगसाठी करत होतो. लवकरच आता याद्वारे पैसेही पाठवता येणार आहे. याद्वारे कोणत्याही खात्यातील धारकांना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)मध्ये पैसे पाठविता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपने जूनमध्ये इन्स्टंट पेमेंट सव्‍‌र्हिस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारख्या वित्तीय संस्थांशी बोलणी केली. ज्याप्रमाणे इन्स्टंट मेसेज डिलिवर होते त्याचप्रमाणे दोन खातेधारकांमध्ये पैसे हस्तांतरण करता येईल. व्हीचॅट आणि हाईक मेसेजिंग अ‍ॅप पहिल्यापासूनच पेमेंट सव्‍‌र्हिसलाच सपोर्ट करतात.

व्हॉट्सअ‍ॅपवर यूटय़ूब व्हिडीओजही पाहता येणार!

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने फाइल ट्रान्सफरसाठी नवे अपडेट आणले होते. या अपडेटमुळे वापरकर्ते कोणत्याही फॉरमॅटमधील फाइल ट्रान्सफर करू शकतो. नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार चॅटदरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला व्हिडीओही पाहता येतील. व्हॉट्सअ‍ॅपवर यूटय़ूब व्हिडीओजही पाहता येणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले यूटय़ूब व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागते. त्यानंतर यूटय़ूब चॅनेलवर आपण व्हिडीओ पाहू शकतो.

मात्र या नव्या फीचरमुळे तुम्ही चॅटबॉक्समध्ये यूटय़ूब व्हिडीओ प्ले करू शकता. तसेच या व्हिडीओला लहान अथवा मोठे करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता कोणतीही फाइल पाठवणे शक्य 

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर आले आहे. या फीचरमुळे  तुम्हाला आता कोणत्याही फाइल्स पाठवता येणार आहे.

यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने पीडीएफ फाइल पाठविण्याचे फीचर दिले होते.  त्यात १०० एमबीची फाइल पाठवता येते. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्याही प्रकारची फाइल पाठविण्याचे फीचर नव्हते. त्यानंतर  कंपनीने फोटो, ऑडिओ आणि व्हिडीओसह पीडीएफ फाइल्स शेअरिंगला सुरुवात केली.

पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएलएससारख्या फाइल पाठविण्याचे ऑप्शन आहे. त्यामुळे सर्व फाइल फॉरमॅट व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविता येणार आहेत.

आता कॅशलेस व्यवहारासाठी गुगलचे नवीन ‘तेज’ मोबाइल पेमेंट अ‍ॅप

भारतातील झपाटय़ाने वाढणाऱ्या डिजिटल पेमेंट बाजारात गुगलचं ‘तेज’ हे यूपीआय बेस्ड डिजिटल पेमेंट अ‍ॅप दाखल होत आहे.

भारतात ही सेवा सुरू करण्यामागे ऑनलाइन मार्केटचा विकास हे महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची वाढती संख्या आणि स्मार्टफोनची विक्री हेही कारण आहे. भारत सध्या जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे

‘तेज’ हे ‘मेक इन इंडिया’ उत्पादन असून, ‘अ‍ॅण्ड्रॉईड पे’प्रमाणे ते काम करणार आहे. तेज हा हिंदी शब्द असून, त्याचा अर्थ आहे गती. गतिमान सेवेचे प्रतीक म्हणून हे नाव गुगलने निवडले आहे, असे  गुगल इंडियाकडून सांगण्यात आलेलं आहे.

यूपीआय भारतीय राष्ट्रीय देयक निगमकडून लाँच करण्यात आलेली देयक प्रणाली आहे. ही प्रणाली भारतीय रिझव्‍‌र्ह बँक नियंत्रित करते. यूपीआयच्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर दोन बँक खात्यांत पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा ही सिस्टीम उपलब्ध करून देते.

फ्रीचार्ज,पेटीएम, मोबिक्विक तसेच विविध नामांकित बँकांची स्टेट बँक बडी, आयसीआयसीआय पॉकेटस, एचडीएफसी चिलर, सिटी मास्टरपास अशी अ‍ॅप्स लोकप्रिय झालेली आहे. त्यामुळे देशातील लहान गावांमध्येही आता डिजिटल पेमेंटचा पर्याय स्वीकारला जात आहे. भारतात अ‍ॅपमुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठे बदल होणार आहे.

स्मार्ट सिटीसाठी इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर

इंटरनेट ऑफ थिंगअंतर्गत स्मार्टफोनद्वारे नियंत्रित करा घरातील तसेच कार्यालयातील उपकरणे

‘मेक इन इंडिया होम अ‍ॅटॉमेशन डिव्हाइस’

पुणे : मोबाइलवरून घरातील, कार्यालयातील दिवे, पंखे सुरू अथवा बंद करता येणे आता अगदी सहज शक्य झालेला आहे. असे डिव्हाइस पीआयसीटी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या नीलेश गावडे या उच्चशिक्षित तरुणाने बनविले आहे.

मोबाइलवरून उपकरणे नियंत्रित करण्यासाठी कुठल्याही अंतराचे बंधन नसलेले हे भारतातील पहिलेच अशा प्रकारचे डिव्हाइस आहे. या क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून याचे कौतुक होत आहे

‘स्मार्ट स्विच डिव्हाइस कंट्रोलर’ हे या डिव्हाइसचे नाव आहे.  मोबाइलवर एका अ‍ॅप्लिकेशनद्वारे बसल्या जागेवरूनच तुमची सर्व कामे करणे आता शक्य झालेले आहे. याकरिता कुठल्याही रेंजची मर्यादा नाही. कुठूनही तुम्ही हे उपकरण वापरू शकता. या  डिव्हाइसद्वारे घरातील कोणतीही आणि कितीही विजेची उपकरणे, टय़ुब, एसी, फ्रीज, बल्ब, टीव्ही, फॅन इत्यादी सुरू अगर बंद करणे शक्य आहे. मोबाइलमधील इंटरनेटद्वारे अ‍ॅप्लिकेशन कनेक्ट करून  हे डिव्हाइस कार्यरत होते. या डिव्हाइसचे निर्माते नीलेश गावडे यांनी सांगितले की, बाहेर गेल्यानंतर घरी असलेल्यांना विजेच्या उपकरणांना बंद करण्याकरिता स्मार्टफोनद्वारे डिव्हाइसला जोडलेले मुख्य स्वीच बंद करता येते.

 डिव्हाइसबद्दल माहिती

‘स्वीच बोर्ड’ला  अदृनो मिक्रोकंट्रोलरचे उपकरण जोडलेले असून, मोबाइलमध्ये त्याचे प्रोग्रामिंग आहे तिथे टय़ुब, एसी, फ्रीज, बल्ब, टीव्ही, फॅन असे विविध आयकॉन आहेत. या आयकॉनना टच करून ते सुरू अथवा बंद करता येतात. हे निर्माण केलेले उपकरण इंटरनेटद्वारे मोबाइलला जोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही कुठूनही स्मार्टफोनद्वारे या उपकरणाशी जोडले गेलेले घरातील, कार्यालयातील विजेवरील उपकरणे चालू असेल तर बंद करू शकता.

सुरक्षितता

स्मार्टफोनद्वारे या उपकरणाला जोडण्यासाठी ‘पासवर्ड’ देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपले डिव्हाइस केवळ आपणच वापरू शकतो.

डिव्हाइसची किंमत 

डिव्हाइसची किंमत सध्या पाच हजार रुपये निश्चित केली आहे. या उपकरणामुळे विजेचा अपव्यय टाळता येईल. इंटरनेट ऑफ थिंग्सद्वारे ऑटोमॅटिक कंट्रोलिंग म्हणजेच घरातील विजेवरील उपकरणे करणे नियंत्रित करणे शक्य होईल.

‘तेज’ मोबाइल पेमेंट अ‍ॅपमध्ये उपलब्ध सुविधा :

* तेज अ‍ॅपवर इंग्रजी, मराठी, कन्नडा, बंगाली, गुजराती, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषा उपलब्ध असतील.

* ग्राहकांना अ‍ॅपद्वारे पैसे पाठवणे, बँक खात्यात थेट पैसे स्वीकारणे, बिल पेमेंट अशा सुविधा मिळणार आहेत

* तेज अ‍ॅपने अत्यंत सुलभतेने एका बँकेतून दुसऱ्या बँकेत रक्कम ट्रान्सफर करू शकता.

* तेजमध्ये उपलब्ध असलेल्या कॅश मोडद्वारे तात्काळ एखाद्याला पैसे पाठवणे किंवा पैसे स्वीकारणे सोपे झाले आहे.

* तेजमध्ये उपलब्ध असलेल्या कॅश मोडद्वारे किराणा दुकानदार, दूधवाला, सलूनवाला इत्यादी व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट करू शकता.

* या अ‍ॅपद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करायची सुविधा उपलब्ध होणार आहे.

भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात आणखी काही बडय़ा कंपन्या उतरत आहेत

यूपीआय आधारित इंटरफेस प्लॅटफॉर्म विकसित करीत असल्याची घोषणा व्हॉट्सअ‍ॅपने केली आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून एनपीसीआय आणि काही बँकांशी चर्चा सुरू केलेली आहे.

तसेच फ्लिपकार्ट, फेसबुक, ट्रकॉलर, या कंपन्यांनीही मोबाइल पेमेंट सेवा सुरू करण्याची तयारी केलेली  आहे.

 

संकलन – प्रा. योगेश हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

(handgeyogesh@gmail.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2017 5:22 am

Web Title: new features on whatsapp
टॅग Whatsapp
Next Stories
1 टेक-नॉलेज : मेमरी कार्डमधील माहिती रिस्टोअर कशी करायची?
2 ‘सेल्फी’ पल्याड सारं जुनंच!
3 ‘तेज’ व्यवहार
Just Now!
X