04 July 2020

News Flash

डोंबिवली: ‘मिशन मंगल’चा शो सुरु असताना चित्रपटगृहाचे छत कोसळले आणि…

चित्रपटाचा शेवट सुरु असतानाच अचानक छत कोसळले

'मिशन मंगल'चा शो सुरु असताना दुर्घटना

डोंबिवलीमधील मधुबन चित्रपटगृहामध्ये चित्रपटाचा खेळ सुरु असताना छप्पर पडून दोनजण जखमी झाले आहेत. मधुबन चित्रपटगृहात ‘मिशन मंगल’चा खेळ सुरु असताना अचानक चित्रपटगृहाचे छप्पर खाली पडले आणि त्यामध्ये एक महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे.

चित्रपटाचा शेवट सुरु असतानाच अचानक चित्रपटगृहाचे छप्पर कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेमध्ये नंदिनी गणपुले ही महिला तर हिमानी झोपे ही लहान मुलगी जखमी झाली. हिमानीच्या डाव्या पायाला आणि हाताला किरकोळ जखम झाली असून नंदिनी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या दूर्घटनेनंतर चित्रपटगृहाच्या प्रशासनाने दोघींनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मधुबन चित्रपटगृहाची डागडुजी करण्याची मागणी मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षकांकडून केली जात होती. मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केलं. मात्र रविवारच्या दूर्घटनेनंतर चित्रपटगृहाची तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे चित्रपटगृह प्रशासनाने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2019 9:21 am

Web Title: ceiling of madhuban talkies collapses 2 women injured in dombivali scsg 91
Next Stories
1 ठाण्यातील कलाकारही कोंडीत
2 नियम ‘टोल’वले जात असल्याने कोंडीत भर
3 मुंबई-नाशिक महामार्गावर राडारोडा
Just Now!
X