सरकारने फक्त लाजेखातर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात केली अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. देशातील जनता नाराज नाही तर मोदींवर रागावली आहे, कारण मोदींनी जनतेला फसवलं आहे. फसव्या आश्वासनांचा बदला जनता निश्चितपणे घेईल असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आपला लढा हा सेना-भाजपबरोबर आहे असे सांगतानाच भाजपाच्या मागे फरफटत जाणाऱ्या सेनेचा आणि त्यांच्या प्रमुखांचा चांगलाच समाचार घेतला. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्यांना हात घातला शिवाय कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी भरण्याचेही काम केले. या मेळाव्यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. तर या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले. गेले दोन दिवस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा संयुक्त दौरा सुरु असून या दौऱ्याला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अंबरनाथ, भिवंडी आणि शेवटी ठाणे शहरामध्ये कार्यकर्ता मेळावा पार पाडला. भिवंडीमध्ये निरीक्षक नसीम सिद्दीकी,नगरसेवक खालीद गुड्डू आदींसह इतरप्रमुख पदाधिकारीउपस्थित होते. ठाणे शहर कार्यकर्ता मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील,माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद,जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे,निरिक्षक हिंदूराव अशोक पराडकर, नगरसेवक नजीब मुल्ला, महिला जिल्हाध्यक्षा करीना दयालानी, माजी महापौर मनोहर साळवी, ठाणे विरोधी पक्षनेता मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे, ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर, युवक अध्यक्ष मंदार केणी, विदयार्थी अध्यक्ष अभिजित पवार, युवती अध्यक्षांसह सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.