अग्निशमन दलावर कामाचा वाढता भार; दोन महिन्यांत ३०० साप, ५० प्राणी, ३७ पक्षी पकडण्याची कार्यवाही

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

आग विझविणे हे अग्निशमन दलाचे मुख्य काम असले तरी इतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी मदतीचे आणि बचावाचे काम अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागते; परंतु पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या तसेच साप आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत आहे. पावसाळ्यातील गेल्या दोन महिन्यांत वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल ३०० हून अधिक साप पकडले आणि ५० विविध प्राणी पकडले असून उन्मळून पडलेल्या २२५ झाडांना बाजूला केले आहे. या शिवाय अडकेलल्या ३७ पक्ष्यांची सुटका केली आहे.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी साप आणि सरपटणारे प्राणी दिसतात. नागरी वस्तीत साप दिसला की नागरिक अग्निशमन दलाची मदत मागतात. गेल्या दोन महिन्यांत म्हणजे जून आणि जुलै २०१६ या महिन्यात वसई-विरार शहरात तब्बल ३०९ साप नागरी वस्त्यांमध्ये आढळून आले होते. अग्निशमन दलांनी या सापांना पकडून पुन्हा जंगलात सोडले आहे. याशिवाय माकड, घुबड, रानमांजर असे जंगली श्वापद नागरी वस्तीत शिरू लागले आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवानांना या श्वापदांना पकडण्याचे काम करावे लागते. हे प्राणी जखमी असतील तर त्यांच्यावर आम्ही उपचार करतो आणि नंतर मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन सोडतो, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

अनेकदा कावळे, चिमण्या आदी पक्षी अडकलेले असतात. त्यांची सुटका करण्याचे कामही  दलाला करावी लागते. या दोन महिन्यांत अग्निशमन दलाच्या जवानांनी  ३७  पक्ष्यांची सुटका केली.

झाडे पडण्याच्या घटनांमध्येही वाढ

या पावसाळ्यात झाड कोसळण्याच्या घटना अधिक घडल्या आहेत. शहरात जून २०१६ आणि जुलै २०१६ या दोन पावसाच्या महिन्यात तब्बल २२८ झाडे उन्मळून पडली होती. सुदैवाने त्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचे नुकसान झाले. ‘झाडे पडल्यावर ती वेळेत कापून बाहेर काढावी लागतात. झाडाखाली लोक अडकलेली असतात. त्यांना त्वरित  बाहेर काढणे गरजेचे असते. विद्युततारांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित होतो पावसात ही कामे वाढतात, असे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.

आम्ही कुठल्याही नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीला तोंड देण्यास सज्ज आहोत. पावसाळ्यात सर्प आढळणे, झाडे पडणे या घटना वाढतात हे खरे आहे. परंतु आम्ही त्वरेने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करत असतो.

– दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी, वसई-विरार महापालिका

chart