महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पनवेल दौऱ्यावर आहेत. त्यांनी पनवेलमधील करोना रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

“पनवेलमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४६ टक्के आहे. जून महिन्यात पनवेलमध्ये करोना रुग्ण मोठया प्रमाणावर वाढले आहेत” असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. ‘संख्येच्या व्यवस्थापनावर नको, तर रुग्ण व्यवस्थापनावर लक्ष द्या’ असे त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे.

आणखी वाचा- मुंबईपेक्षा आता ठाण्यात करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जास्त!

आणखी वाचा- तीन पक्षाचं सरकार… “खाटांची” रोज कुरकुर; आशिष शेलारांची टीका

फडणवीस यांनी पनवेल महापालिकेला सुद्धा भेट दिली व प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. पनवेलमध्ये गंभीर स्थिती असून जास्तीत जास्त चाचण्या हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “रुग्णांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाइन करणे, यानेच करोना व्हायरसचा फैलाव रोखता येऊ शकतो” असे फडणवीस यांनी सांगितले.