पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित असले तरी आता जूनचा पहिला आठवडा उलटला तरी नाले तुंबलेलेच आहेत. मेअखेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचा दावा ठाणे महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र शहरातील अध्र्या-अधिकनाल्यांमध्ये गाळ अजून तसाच आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला तर ठाण्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची भीती आहे. कळवा स्थानकालगत असलेला न्यू शिवाजी नगरचा नाला कचऱ्याने काठोकाठ भरला आहे. सह्य़ाद्रीनगर, गांधी नगर, साठे नगर, ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाजूला आणि घोडबंदर रोड येथील दलाल कंपनीलगत असलेल्या नाल्याची अद्याप सफाई झालेलीच नाही.