19 October 2020

News Flash

पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक

रविवार, २४ एप्रिल रोजी सकाळी ७.१५ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत जम्बो ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम

पश्चिम रेल्वेच्या सफाळे व वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीकरिता रविवार, २४ एप्रिल रोजी सकाळी ७.१५ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत जम्बो ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत या मार्गावरील सर्व लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईहून सुटणाऱ्या या गाडय़ा रद्द

७.२६ला सुटणारी चर्चगेट-डहाणू लोकल, ७.५०ची डोंबिवली-बोईसर डीएमयू, ९.०८ची बोरिवली-डहाणू लोकल, ९.४६ची विरार-डहाणू मेमू, ११.३८ची बोरिवली-डहाणू लोकल, १२.०१ची विरार-वलसाड शटल, १२.०८ची बोरिवली-डहाणू लोकल, १२.२९ची विरार-डहाणू मेमू, १२.४८ची विरार-डहाणू लोकल, दुपारी १.५४ची विरार-डहाणू मेमू, ३.४९ची विरार-डहाणू लोकल,५.०९ची चर्चगेट-डहाणू लोकल

विरारहून सुटणारी सूरत शटल डहाणू येथून सोडण्यात येणार आहे, तर सूरत-विरार शटल, अहमदाबाद-मुंबई पॅसेंजर आणि वापी-विरार शटल या गाडय़ा केळवा रोड स्थानकापर्यंतच धावणार आहेत.

फिरोजपूर जनता एक्स्प्रेस अनिश्चित वेळेनुसार धावतील. मुंबईकडे जाणारी गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र जनता, फ्लाइंग राणी आणि वलसाड एक्स्प्रेस या गाडय़ा उशिराने धावणार आहेत.

पहाटे ५.२९     डहाणू-विरार शटल

सकाळी ८.४९    बोईसर-वसई डीएमयू

सकाळी ९.०५    डहाणू-बोरिवली लोकल

सकाळी १०.०७   डहाणू-विरार मेमू

सकाळी १०.४०   डहाणू-विरार लोकल

दुपारी २.४२     डहाणू-विरार मेमू

दुपारी १.१७     डहाणू-चर्चगेट लोकल

दुपारी २.००     डहाणू-विरार लोकल

दुपारी २.४७     डहाणू-दादर मेमू

दुपारी ३.५५     डहाणू-दादर लोकल

संध्या. ५.५२    डहाणू-विरार मेमू

संध्या. ६.१०    डहाणू-चर्चगेट लोकल

संध्या. ६.५२    वलसाड-वांद्रे पॅसेंजर

संध्या. ७.४०    डहाणू-चर्चगेट लोकल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 1:20 am

Web Title: jumbo mega block on western railway on sunday
Next Stories
1 शाळा ताब्यात नसतानाही कोटय़वधींची तरतूद
2 आधीच तंत्रज्ञानाचा बोजवारा, त्यात ‘अ‍ॅप’चा वारा!
3 रस्ता रुंदीकरण करणारच..
Just Now!
X