08 August 2020

News Flash

पालघर साधू हत्याकांड: ८०८ संशयित, १५४ अटक, ११८ साक्षीदार; सीआयडीकडून ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल

पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून डहाणू कोर्टात आरोपपत्र दाखल

संग्रहित

पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. १६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५४ जणांना अटक केली असून ११ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत.

पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सोबतच राज्य सरकारवर टीका होऊ लागली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीयआडीकडून एएनआयला देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी डहाणू कोर्टात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे”.

सीआयडीकडून आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी ८०८ संशयितांची चौकशी करण्यात आली असून १०८ साक्षीदांरांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी १५४ जणांना अटक करण्यात आलेली असून ११ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कोणत्याही आरोपीला जामीनावर सोडण्यात आलेलं नाही अशी माहिती सीआयडीने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 8:25 am

Web Title: maharashtra criminal investigation department cid submits a charge sheet in palghar lynching case sgy 87
Next Stories
1 ‘चौथ्या मुंबई’ला मर्यादित चाचण्यांची घरघर
2 ठाण्यातील खरेदीच्या पद्धती बदलणार
3 टाळेबंदीमुळे पत्रीपुलाच्या शुभारंभाला विलंब?
Just Now!
X