मनसेच्या उपाध्यक्षापाठोपाठ ज्येष्ठ नगरसेवकाचीही पक्षाला सोडचिठ्ठी

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात पक्षांतराचे वारे घोंघावू लागले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा जोरदार तडाखा बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटतात न तोच, ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडले.

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

करोना संकटामुळे नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, गेल्या महिन्यात जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता या महापालिकांच्या निवडणुकाही कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पाश्र्वाभूमीवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवार सक्रिय झाले आहेत. कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतल्यानंतर निवडून येऊ शकतो, याची चाचपणी करत अशा उमेदवारांनी आता पक्ष प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असून या सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचेही चित्र समोर आले आहे. यामुळे या पक्षामध्येही प्रवेश करण्याकडेही अनेकांचा ओढा दिसून येत आहे. तसेच आपला पक्ष मजबूत करण्यासाठी नेत्यांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी इतर पक्षांतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावले जात आहे. फोडाफोडीच्या राजकारणाची सर्वाधिक झळ मनसेला बसली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवलीतील राजकीय पदाधिकारी राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी मंगळवारी दादर येथील कार्यालयात  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश केला. या दोन पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने शहरी भागातील मनसेचा प्रभाव झटकन ओसरण्याची शक्यता आहे.

‘पक्षनेतृत्वाकडून बेदखल’

पक्षवाढीसाठी, नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतली नाही, अशा शब्दांत मंदार हळबे यांनी पक्षांतराची कारणमीमांसा केली. ‘समाज, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचे टप्पे ओळखण्यात स्थानिक मनसेचे नेतृत्व कमी पडले. स्थानिक पातळीवर मनसेत जे चाललेय त्याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठविला होता. त्यानंतर काही हालचाल झाली नाही,’ असेही ते म्हणाले.

अंबरनाथमध्येही दलबदल

निवडणुकांच्या तोंडावर अंबरनाथमध्येही पक्षांतराला सुरुवात झाली आहे. भाजपचे नगरसेवक सुनील सोनी यांनी नुकताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. सुनील सोनी हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. मात्र मधल्या काळात त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. अंबरनाथ पश्चिाम भागात काही प्रभागांत त्यांचे वर्चस्व आहे.  त्यांच्यापाठोपाठ सोमवारी भाजपचे माजी नगरसेवक तुळशीराम चौधरी, जिल्हा सरचिटणीस सरिता चौधरी, बळीराम पालांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.