उपनगरी प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी विविध योजना राबवीत असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात प्रवासी सुरक्षिततेची पाटी अद्याप कोरीच आहे. याबाबतीत ठाणे या सध्याच्या मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकातील हे चित्र भयावह आहे. दहा फलाट असणाऱ्या या स्थानकात सध्या कोणत्याही दिशेने कुणीही आरामात प्रवेश करू शकतो. तिथे तपासणी सोडा, साधे लक्ष ठेवायलाही कोणतीही व्यवस्था दिसत नाही. मोठा गाजावाजा करून याठिकाणी बसवण्यात आलेले ‘लगेज स्कॅनर’ हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांअभावी पडून आहेत. ठाणेच नव्हे तर कल्याण, डोंबिवली या मोठय़ा स्थानकांतही अशीच परिस्थिती आहे. या स्थानकांत पोलीस कधीच जागेवर सापडत नाहीत. तर स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले अनेक मेटल डिटेक्टर्स बंद अवस्थेतच आहेत. ठाण्यापुढील स्थानकांतील ‘अ’सुरक्षिततेची ही दृश्ये.

Untitled-16

 

Untitled-17

 

Untitled-18

 

Untitled-19

 

Untitled-20