News Flash

डोंबिवलीत दीड तासाचे भारनियमन

डोंबिवली परिसरात महावितरणने मंगळवारपासून विभागवार दीड तासांचे वीज भारनियमन सुरू केले आहे.

| July 16, 2015 12:01 pm

डोंबिवली परिसरात महावितरणने मंगळवारपासून विभागवार दीड तासांचे वीज भारनियमन सुरू केले आहे. भर पावसाळ्यात असह्य़ उकाडा होत आहे. त्यात भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डोंबिवलीतील रामनगर, गणेश मंदिर, नालंदा, दत्तनगर, नवापाडा, टिळकनगर, कोपररोड, शास्त्रीनगर, आगरकर रस्ता या भागातील महावितरणच्या फिडरप्रमाणे हे भारनियमन करण्यात येत आहे. सकाळी सहा ते सकाळी साडेसात या वेळेत दीड तासाचे भारनियमन करण्यात येते. या वेळेत घरातील मुले शाळेत जातात. पाणी तापवण्यासाठी हीटर गरजेचे असते. वीज नसल्याने ते बंद राहते. त्यामुळे गॅसवर पाणी गरम करावे लागते, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.
सकाळी ६ ते सकाळी ७.३०, दुपारी १ ते दुपारी १.४५ मिनिटे, संध्याकाळी ६ ते संध्या. ७.३० अशा भारनियमनाच्या वेळा आहेत. नागरिक, व्यापारी यांच्या सोयीच्या वेळा पाहून भारनियमन करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2015 12:01 pm

Web Title: one and a half hours of load shedding in dombivali
टॅग : Load Shedding
Next Stories
1 बोगस मतदारांचा आज निकाल?
2 वीजटंचाईचा ठाणेकरांना फटका
3 जीवसृष्टीची माहिती देणारे लाखमोलाचे ग्रंथ
Just Now!
X