News Flash

बदलापूरची नालेसफाई वाऱ्यावर

विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर युतीच्या नगरसेवकांची पर्यटनवारी; कंत्राटांना कार्योत्तर मंजुरीचा निर्णय
बदलापूर शहरातील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू व्हावीत यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेस सोमवारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा एक नगरसेवक वगळता संपूर्ण सभागृह रिकामे होते. पुरेशा गणसंख्येअभावी ही सभा तहकूब करावी लागली. नालेसफाईची कामे सुरू करा, ठेक्यास कार्योत्तर मंजुरी दिली जाईल, असे आदेश यावेळी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचे नगरसेवक राजकीय पर्यटनाला निघाल्याचा नालेसफाईचे त्रांगडे उभे राहिल्याची चर्चा रंगली आहे.
ठाणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आचारसंहिता लागल्याने आधीच नियमित नालेसफाईचे काम बदलापुरात रखडले होते. ही अत्यावश्यक कामे असल्याने निवडणूक आयोगाची मंजुरी घेऊन शहरातील मुख्य नाल्यांची सफाईच्या ठेक्यांना मंजुरी द्यावी यासाठी ३० मे रोजी बदलापूर नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मतदार नगरसेवकांना गोवा तसेच महाबळेश्वरला रवाना करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी बदलापूर आणि अंबरनाथ पालिकेतील शिवसेना-भाजपचे नगरसेवक पर्यटनासाठी मार्गस्थ झाले.
रहिवाश्यांमध्ये भीती
बदलापुरात कात्रप, शिरगांव, खरवई, बॅरेजरोड, हेंद्रेंपाडा, बेलवली, मांजर्ली, स्टेशन रोड, रेल्वे लाईनला लागून असलेल्या परिसरातून शहरातील मुख्य नाले वाहतात. पावसाळा काही दिवसांवर आला असताना अद्याप शहरातील प्रमुख नाल्यांच्या सफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या नाल्यांच्या आसपास रहाणारे रहिवाशी चिंतातूर आहेत. नगरपालिकाने शहरातील नाल्यांची सफाई तातडीने सुरू करावी अशी मागणी बदलापुराकरांकडून होत आहे. असे असताना नगरसेवकांच्या राजकीय पर्यटनामुळे सोमवारी आयोजित करण्यात आलेली सभा तहकूब करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर आली.

शिवसेना नेत्यांची तारेवरची कसरत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांची निवडणुकीपूर्वीची चमत्कारित खेळी सर्वश्रुत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत शिवसेनेने गाफिल न राहता प्रत्येक क्षणाला सतर्क राहण्याचे ठरवले आहे. त्याचमुळे सत्ताधारी आणि संख्याबळ असूनही मत एकत्रित ठेवण्यासाठी शिवसेनेला असे प्रयोग करावे लागत आहेत.

बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या तुलनेत युतीच्या नगरसेवकांची संख्या या ठिकाणी अधिक आहे. . त्यामुळे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा एक असे अवघे तीन सदस्य उपस्थित होते. त्यामुळे सभा तहकूब करावी लागली. मात्र, नालेसफाईची कामे रखडू नयेत यासाठी काम सुरू करा ठेक्यांना कार्योत्तर मंजुरी देण्यात येणार आहे.
वामन म्हात्रे, नगराध्यक्ष, बदलापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 5:02 am

Web Title: sewerage cleaning issue in badlapur
टॅग : Sewerage Cleaning
Next Stories
1 मुलांच्या शिक्षणाचा कामगांरापुढे यक्षप्रश्न
2 डोंबिवलीत भंगार रिक्षाचालकांची उपप्रादेशिक परिवहनकडून धरपकड
3 काळा तलावाची सुरक्षा वाऱ्यावर!
Just Now!
X