tv06r
ठाण्याच्या सांस्कृतिक इतिहासाबरोबरच शैक्षणिक इतिहासही तितकाच देदिप्यमान आहे. मो. ह. उर्फ मोतीलाल हरगोविंददास ठाणावाला हायस्कूल त्यापैकीच एक. १८९२ मध्ये जनरल एज्युकेशन इस्टिटय़ूट संस्थेने सुरू केलेली ही शाळा टेंभीनाक्यावर महाजन यांच्या इमारतीत भरत असे. पुढे विद्यार्थीसंख्या वाढल्याने खाडी रस्त्यावर शेठ नगीनदास ठाणावाला यांच्या जागेत अल्प भाडय़ात ही शाळा भरू लागली. त्यांच्याच वडिलांचे नाव या शाळेत देण्यात आले. १९४२ पर्यंत ही शाळा भाजी मंडई परिसरातील छायाचित्रात दिसत असलेल्या इमारतीत भरत होती. १९ व्या शतकात लावलेल्या या शैक्षणिक रोपटय़ाचे आता मोठय़ा वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
(जुने छायाचित्र : सदाशिव टेटविलकर यांच्या संग्रहातून, नवे छायाचित्र : गणेश जाधव)