News Flash

अंबरनाथमध्ये रेल्वेखाली  दोघांचा मृत्यू

लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.

प्रतिनिधिक छायाचित्र

अंबरनाथ : रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर दोघांचा लोकलखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली. मृत्युमुखी पडलेली तरुणी आणि तरुण नात्याने मामा-भाची असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हे आत्महत्येचे प्रकरण आहे का, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील खुंटवली परिसरात राहणारा योगेश बेंडाळी (३२) आणि त्याच परिसरात राहणारी त्याची नातेवाईक प्रीती धादवड (२२) या दोघांचे मृतदेह शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे रुळांवर आढळले. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. मृत्यू झालेले दोघे नात्याने मामा आणि भाची असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. शार्दूल यांनी दिली आहे.

हा प्रकार नेमका कसा घडला आणि मृत्यूचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट होऊ  शकलेले नाही. सध्या पोलीस तपास सुरू असल्याचे शार्दूल यांनी सांगितले आहे. मात्र मृत तरुण योगेश याने स्वत:च्या मोबाइलवर स्वत:ला श्रद्धांजली वाहणारे संदेश ठेवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2020 2:30 am

Web Title: two killed in train accident in ambernath zws 70
Next Stories
1 ठाणे खाडी, उल्हास नदीचे पर्यावरण विश्लेषण
2 ‘टीएमटी’चे सक्षमीकरण
3 तीन मुलांसह महिला मृतावस्थेत
Just Now!
X