रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या अनुयायांनी कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत स्वच्छता अभियान राबविले. शहरातील ३२० किलोमीटरचे रस्ते, पालिकेच्या बाग, उद्याने, मैदाने, गटारांची सफाई श्री सदस्यांनी केली. दिवसभराच्या साफसफाईत अनुयायांनी १०० टन कचरा संकलित केला.
रविवारी सकाळी महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, तुरुंगाधिकारी सुहास पवार, नायब तहसीलदार डॉ. कदम यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. दिवसभर प्रतिष्ठानचे सदस्य शहरातील साफसफाई करीत होते. कल्याण, डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये प्रतिष्ठानचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2015 रोजी प्रकाशित
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांकडून १०० टन कचरा संकलित
दिवसभर प्रतिष्ठानचे सदस्य शहरातील साफसफाई करीत होते. कल्याण, डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये प्रतिष्ठानचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते.
Written by मंदार गुरव

First published on: 24-12-2015 at 00:16 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 tonnes of waste collected by nanasaheb dharmadhikari