डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग | 14 year old minor girl molested by senior citizen in dombivli zws 70

डोंबिवली– येथील पूर्व भागात राहत असलेल्या एका १४ वर्षाच्या मुलीचा पाथर्ली भागात राहणाऱ्या एका ५९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने शुक्रवारी सकाळी विनयभंग केला. ही मुलगी राहत असलेल्या इमारतीच्या प्रवेशव्दारात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ज्येष्ठ नागरिका विरुध्द पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मुदतीत कामे करण्यास असमर्थ ठरलेल्या ठेकेदारांना दंड; ठाणे महापालिका प्रशासनाची कारवाई 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योना बेन बेंजामिन असे आरोपीचे नाव आहे. ते पाथर्ली भागातील बाळकृष्ण म्हात्रे इमारतीमध्ये राहतात. टिळकनगर पोलिसांनी सांगितले, पीडित मुलगी शुक्रवारी सकाळी राहत असलेल्या इमारतीच्या प्रवेशव्दारातून बाहेर पडत होती. त्याचवेळी आरोपी योना बेंजामिन तेथून जात होते. पीडित मुलीला काही कळण्याच्या आत योना यांनी पीडित मुलीचा विनयभंग केला. मुलीने तात्काळ घरी जाऊन आपल्या आईला प्रकार सांगितला. आईच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी आरोपी योना बेंजामिन विरुध्द विनयभंग, पाॅक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक चुंबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.