scorecardresearch

ठाणे : भिवंडीत २१ किलो गांजा जप्त

भिवंडी येथील कामतघर भागात ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २१ किलो गांजा जप्त केला आहे.

Cannabis
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : भिवंडी येथील कामतघर भागात ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २१ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी हसन शेख (२१) याला अटक केली असून त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामतघर येथील हनुमाननगर भागात एकजण घरामध्ये गांजा साठवून ठेवत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना त्याच्या घरामध्ये २१.३१० किलो वजनाचा ३ लाख १५ हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हसन याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 21 kg cannabis seized in bhiwandi by thane crime branch zws

ताज्या बातम्या