ठाणे– जिल्ह्यात दिवसेंदिवस लंपी आजाराने बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४३ लंपी बाधित जनावरे आढळून आले आहेत. लंपीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत असून बाधित क्षेत्रातील ५ किलोमीटर परिघातील परिक्षेत्रात जनावरांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.

हेही वाचा <<< पंतप्रधान नरेंंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये ठाण्यात? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करणार शक्तीप्रदर्शन, कधी ते वाचा…

Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प

जिल्ह्यात दिवसेंदिवस लंपी आजाराचा प्रादूर्भाव वाढत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लंपीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कशाप्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत, याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. जिल्ह्यात शुक्रवारी लंपी बाधित जनावरांची संख्या ४३ वर पोहचली असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.यामध्ये शहापूर तालुक्यातील १२ गायीवर्ग, भिवंडीत चार, कल्याण दोन, पशु सर्व चिकित्सालय शेलार येथे १० जनावरांमध्ये, तालुका लघु चिकित्सालय शहापूर येथील चार आणि बदलापूर तालुका लघु चिकित्सालय येथील ११ जनावरांचा समावेश आहे. लंपीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून या जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रातील ५ किलोमीटर अंतरातील प्राण्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण करण्यासाठी ३८ हजार लसीचा साठा उपलब्ध आहे. तसेच जनावरांना ही लस मोफत देण्यात येत असून ज्या पशु पालकाला जनावरांमध्ये लपी आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पशु दवाखान्यात जाऊन जनावराची तपासणी करावी. तसेच जनावरांच्या तपासणीसाठी दहा रुपये आकारणी करण्यात येत असते. मात्र, या आजाराची पार्श्वभूमीवर अशी कोणतीही आकारणी करण्यात येत नसल्याची माहिती डॉ. रुपाली सातपुते यांनी यावेळी दिली. तसेच जर कोणी तपासणी दर आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील बदलापूर, शहापूर, भिवंडीतील शेलार, भिवंडी पालिका हद्दीतील बाधित क्षेत्रातील १० हजार ५७७ जनावरांपैकी आतापर्यंत ८ हजार ४५० जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.

हेही वाचा <<< ठाणे : पावसाच्या संततधारेमुळे भिवंडी तुंबली; भिवंडी येथील कशेळी भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी

जिल्ह्याला लंपीचा धोका कमी

अद्याप म्हशींमध्ये लंपीची लागण झाल्याचे दिसून आलेले नाही. गायी वर्गाच्या जनावरांमध्ये अधिकप्रमाणात हा आजार आढळून येत आहे. परंतू, ठाणे जिल्ह्यात गायीवर्गाचे प्रमाण कमी असून म्हैस वर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात या आजाराचा धोका कमी असल्याचे मत पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.