जिल्ह्य़ात सोमवारी ९६७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ७ हजार ५३३ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ३ हजार ७५ इतकी झाली आहे.
सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील २५०, नवी मुंबईतील २४०, ठाणे शहर १९३, मीरा-भाईंदर ९८, ठाणे ग्रामीण ६८, बदलापूर ५५, उल्हासनगर ३८, अंबरनाथ २१ आणि भिवंडीतील ४ रुग्णांचा समावेश आहे.
मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीमधील ६ ठाणे शहर ६, मीरा-भाईंदर ६, नवी मुंबई ५, उल्हासनगर ४, बदलापूर ३, ठाणे ग्रामीण ३, भिवंडी तील २ आणि अंबरनाथमधील २ रुग्णांचा समावेश आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.