ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात शुक्रवारी काही जणांच्या जमावाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता. या हल्ल्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले असल्याचा आरोप ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता.

हेही वाचा- शिंदे गट आणि भाजपा वाद विकोपाला: वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ

शनिवारी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर रात्री उशीरा याप्रकरणी विकास रेपाळे, नम्रता भोसले यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रशांत यांच्यावरही रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या संपूर्ण प्रकारामुळे राज्यात सारेकाही आलबेल दिसत असलेल्या भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील वितुष्ट मात्र समोर येत आहे.

हेही वाचा- ठाणे: आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानाप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काही जणांचा फलक बसविणाऱ्यावरून वाद झाला होता. याप्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी अचानक १५ ते २० जणांचा जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून त्यांना शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांची स्थिती बिघडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करण्यास सुरूवात केली होती. त्यांसदर्भाचे ट्विटही ‘भाजप ठाणे’ या खात्यावरून करण्यात आले होते. विकास रेपाळे आणि नम्रता भोसले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंत्यत निकटवर्तीय मानले जातात. असे असतानाच आता या मारहाण प्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे. या चित्रीकरणात प्रशांत जाधव यांना काही जण मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- ठाणे : कळव्यात १५ किलो गांजा जप्त; चार जणांना अटक

भाजपचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. तर यावेळी निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये मारहाण करणाऱ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लागलीच गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी यावेळी पोलिसांजवळ केली. तसेच पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे असे पोलिसांना यावेळी सांगितले. तर जो पर्यंत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातच बसून राहण्याच्या इशारा यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना दिला होता. शनिवारी रात्री उशीरा याप्रकरणी विकास रेपाळे, नम्रता भोसले यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रशांत जाधव यांच्याविरोधातही रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा- ठाणे: पोलिओ लशीची तिसरी मात्रा जानेवारी पासून

दादागिरी खपवून घेतील जाणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. ठाणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात. या शहरात अशा प्रकरची कृत्य होणं अयोग्य आहे. भाजपा कार्यकर्त्यावरील हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. तसेच शहरात चालणारी दादागिरी अजिबात चालणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाला आहे. त्यानुसार जे गुन्हेगार आहेत, त्याच्यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी गांभिर्याने कारवाई करावी.यासाठी लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.