डोंबिवली: डोंबिवलीत एका डॉक्टरने एका वैद्यकीय व्यावसायिकाला मारहाण केली आहे. व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गाळ्याच्या अनामत रकमेवरुन दोघांमध्ये भांडण झाल्याने हा प्रकार घडला आहे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

डोंबिवली जवळील २७ गावातील उंबार्ली रस्त्यावर डाॅ. पाटील यांचा दवाखाना आहे. या दवाखान्यात हा प्रकार घडला आहे. मोहम्मद हुसेन जैरुद्दिन अन्सारी (२४) असे औषध विक्रेत्याचे नाव आहे. डॉक्टर पाटील यांचा मानपाडा भागात दुकानाचा गाळा आहे. हा गाळा अन्सारीने वैद्यकीय व्यवसायासाठी भाड्याने घेण्याचे ठरविले होते. या बदल्यात डाॅ. पाटील यांना अन्सारीने पाच हजार रुपये अनामत रक्कम दिली होती. अनामत रक्कम देऊनही डाॅ. पाटील यांनी अन्सारी यांना काहीही न सांगता त्यांचा गाळा अन्य एका भाडेकरुला व्यवसायासाठी दिला. आपणास गाळा भाड्याने द्यायचा नसल्याने यापूर्वी दिलेले पाच हजार रुपये परत करा म्हणून अन्सारीने पाटील यांच्याकडे तगादा लावला होता. सतत फेऱ्या मारुनही पैसे परत मिळत नसल्याने अन्सारी त्रासला होता.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

हेही वाचा >>> टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात महिलेची प्रसूती

बुधवारी अन्सारी आणि त्याचा मित्र डाॅ. पाटील यांच्या दवाखान्यात अनामत रक्कम परत मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाटील आणि अन्सारी यांच्यात बाचाबाची झाली. डाॅ. पाटील यांनी अनामत रक्कम परत करण्यास नकार दिला. अन्सारी यांना दवाखान्यातून जाण्यास सांगितले. यावेळी पाटील यांनी दवाखान्यातील लोखंडी सळईचा वार अन्सारी यांच्या डोक्यात केला. ते रक्तबंबाळ झाले. अन्सारी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. जोशी तपास करत आहेत.