ठाणे : सिगारेट दिली नाही म्हणून एकाच्या डोक्यात दगड मारून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अब्दुल हुसेन असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल विश्वकर्मा याच्याविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल हुसेन हे तुलशीधाम परिसरात राहत असून ते एका चायनिसच्या गाडीवर स्वयंपाकी म्हणून काम करतात. बुधवारी सायंकाळी ते एका ठिकाणी उभे असताना एक २५ वर्षीय मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने अब्दुल यांच्याकडे सिगारेट मागितली. अब्दुल यांनी त्याला सिगारेट नाही असे सांगितले असता त्याने अब्दुल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने एक दगड अब्दुल यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे अब्दुल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा – उल्हासनगरच्या आमदार कुमार आयलानींच्या मुलाची १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार अब्दुल यांच्या मित्राला दिसताच ते त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्याचवेळी तो तरूण तिथून पळून गेला. अब्दुल यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – ठाणे महापालिकेच्या प्रसुती गृहात आग

अब्दुल यांना मारहाण करणारा विशाल विश्वकर्मा होता, अशी माहिती अब्दुल यांच्या मित्राने त्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अब्दुल यांची तक्रार नोंदवून याप्रकरणी विशाल विरोधात गुन्हा दाखल केला आहे.