ठाणे: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आज ७ मे रोजी युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील कर्णिक मार्गावरील रामबाग लेन येथील मॅक्सी मैदान परिसरात दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल केले जाणार आहे. हे मॉक ड्रिल कशा पद्धतीने होणार आहे, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. तर या मॉकड्रीलबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

देशातील २५९ शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश असून, आज ७ मे रोजी एकाचवेळी हे मॉक ड्रिल्स केले जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. या मोहिमेला केंद्र सरकारकडून “ऑपरेशन अभ्यास ” असे नाव देण्यात आले आहे.

असे होणार कल्याणमध्ये मॉक ड्रिल

– कल्याण येथील मॅक्सी मैदान, रामबाग लेन, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे आज ७ मे रोजी दुपारी ४ वाजता हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.

– कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण ४ सायरन एकाच वेळी वाजणार.

– Air Strike/ बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार

– सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार.

– धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल.

– संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. यावेळी नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.