राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने आज मुंब्रा आणि ठाण्यामधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यानंतर सकाळीच आव्हाड यांनी ट्वीट करुन आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर या प्रकरणावर सर्वच स्तरांमधून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत ते का येऊन पोहोचले आहेत याबद्दल खुलासा केला.

नक्की वाचा >> “…तर बाजारात, ट्रेनमध्ये, गर्दीत रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील”; पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋता आव्हाडांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर आव्हाड यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती दिली. आधी जयंत पाटील यांनी एक चित्रफित दाखवत कथित विनयभंगाचा प्रकार घडण्याआधीचा घटनाक्रम दाखवत आव्हाड यांनी आरोप करणाऱ्या महिलेचा उल्लेख बहीण असा केल्याचा दावा केला. जयंत पाटील यांनी ज्या ३५४ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामधील नेमका गुन्हा कशाला म्हणतात हे सविस्तरपणे वाचून दाखवलं. तसेच या सर्व प्रकारामध्ये घडलेला प्रकार नेमका कुठे बसतो असा सवाल पाटील यांनी पोलिसांना विचारला.

नक्की वाचा: ‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले हे कुठे…”

आव्हाड यांनी आपली बाजू मांडताना. “खून किंवा इतर कोणताही गुन्हा असता तर ठीक आहे. पण विनयभांगचा गुन्हा दाखल झालाय. मी आयुष्यात कधी असे केले नाही. पोलिसांनी तरीही कसा काय गुन्हा दाखल केला हे कळत नाही,” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला. तसेच, “मी काय शब्द वापरले ते व्हिडीओ पण आहेत. माझी मान समाजात शरमेने खाली जाईल यासाठी हे षडयंत्र आहे,” असा आरोपही आव्हाड यांनी केला.

नक्की पाहा >> आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! पण मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीसमोर नेमकं घडलं तरी काय? Video आला समोर

“माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणी विचारत आहेत की तुझ्या वडिलांनी विनयभंग केलाय का? त्यामुळे राजकारणात न राहिलेले बरे. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील,” असा इशाराच आव्हाड यांनी सर्वच राजकीय पक्षांना आणि विरोधकांना दिला. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड यांनीच “पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हा दाखल केले आहेत. ते ही ३५४… मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे… लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत,” असं ट्वीट सकाळी केलं होतं.

नक्की पाहा >> जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video

नक्की वाचा >> “पुराव्यावाचून वाटेल तशी मूर्खपणाची…”, ‘हर हर महादेव’वरुन सेनेचा हल्लाबोल; ‘धर्मवीर’मध्येही तथ्यांची मोडतोड’ झाल्याचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो थांबवून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रविवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र आता ते या नव्या प्रकरणात अडकले असून या विषयावरुन आता ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.