scorecardresearch

Premium

जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video

राजीनामा देणार असल्याची घोषणा आव्हाड यांनी ट्वीटरवरुन केली आहे

case against jitendra awhad
आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो थांबवून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रविवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र आता आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजेच आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून यानंतर ठाणे शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ करुन वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या समर्थकांनी केला आहे. आव्हाड यांनीही आक्रमक भूमिका घेत थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

नक्की पाहा >> आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! पण मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीसमोर नेमकं घडलं तरी काय? Video आला समोर

sushma andhare on shalini thackeray
“दिवस, वेळ आणि ठिकाण ठरवा”, ‘त्या’ वादावरून सुषमा अंधारेंचं शालिनी ठाकरेंना खुलं आव्हान
ajit pawar
मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर असल्यानं नाराजीच्या चर्चा, अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “आरे बाबा…”
rohit pawar
बारामती अ‍ॅग्रोबाबत रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; विरोधकांना इशारा देत म्हणाले…
Jitendra Awhad and hasan mushrif
“बरगड्या मोडतील, नादाला लागू नका”, धनंजय मुंडेंच्या इशाऱ्याला जितेंद्र आव्हाड प्रत्युत्तर देत म्हणाले…

आव्हाड यांच्याविरोधात भादंविनुसार कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून. लैंगिक शोषण, मारहण किंवा महिलांच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं कृत्य करणाऱ्यांविरोधात या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. याच कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच ठाण्यात तणाव निर्माण झाला असून आव्हाड यांच्या विवियाना मॉलजवळच्या घरासमोर काही ठिकाणी रस्त्यावर जळलेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.

नक्की वाचा: ‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजीमहाराजांशी लढायला गेले हे कुठे…”

“पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हा दाखल केले आहेत. ते ही ३५४… मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे… लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत,” असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: जितेंद्र आव्हाड आणि वाद हे समीकरण नेमके काय आहे?

नक्की वाचा >> “पुराव्यावाचून वाटेल तशी मूर्खपणाची…”, ‘हर हर महादेव’वरुन सेनेचा हल्लाबोल; ‘धर्मवीर’मध्येही तथ्यांची मोडतोड’ झाल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील आक्रमक नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे ‘हर हर महादेव’ चित्रपटास केलेला विरोध आणि त्यानंतर रंगलेल्या अटक नाट्यामुळे पुन्हा एकदा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case against jitendra awhad under section 354 ncp protest in thane scsg

First published on: 14-11-2022 at 08:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×