डोंबिवलीत दत्तनगर मधील घटना

डोंबिवली पूर्व भागातील दत्तनगर परिसरातून रस्त्याने पायी चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला एक मोकाट बैलाने जोराने धडक मारली. त्याचवेळी बाजुने एक बस चालली होती. बैलाने कपाळ आणि शिंगाने मारलेल्या धडकेत ६८ वर्षाचा ज्येष्ठ नागरिक थेट बस खाली फेकला गेला. भरधाव वेगात असलेली बस ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.

हेही वाचा >>> बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ९९ वारसांना कडोंमपात पदस्थापना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवराम धोत्रे (६८) असे मरण पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते दत्तनगर परिसरात राहतात. मंगळवारी संध्याकाळी ते नेहमीप्रमाणे दत्तनगर परिसरातील रस्त्यावरुन पायी चालले होते. त्याचवेळी एक मोकाट उधळलेला बैल वेगाने शिवराम यांच्या अंगावर आला. ते बाजुला होण्यापूर्वीच बैलाने त्यांना कपाळाने जोराची धडक मारली. त्याचवेळी रस्त्याच्या बाजुने एक बस चालली होती. बैलाची जोराची धडक बसल्याने शिवराम रस्त्याच्या दिशेने फेकले जाऊन बसखाली जाऊन पडले. भरधाव बस त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भागातून बस जात नसती तर ते रस्त्यावर पडले असते. त्यांचा जीव वाचला असता, असे या भागातील दुकानदारांनी सांगितले. रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. मोकाट बैल कोणाचा याचा शोध धोत्रे यांच्या नातेवाईकांकडून घेतला जात आहे. या मोकाट बैलाच्या नातेवाईकांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.